नक्षलवाद्यांनी केला निष्पाप आदिवासी तरुणाचा खून

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 जुलै 2018

उपविभाग पेंढरी अंतर्गत पोलीस स्टेशन जारावंडी येथील मौजा सिनभट्टी येथे राहणारा आदिवासी तरुण नामे इसरु चैतु पोटावी (वय 33) याचा नक्षलवाद्यांनी छातीत गोळी झाडून निर्घृणपणे खून केला.

गडचिरोली - उपविभाग पेंढरी अंतर्गत पोलीस स्टेशन जारावंडी येथील मौजा सिनभट्टी येथे राहणारा आदिवासी तरुण नामे इसरु चैतु पोटावी (वय 33) याचा नक्षलवाद्यांनी छातीत गोळी झाडून निर्घृणपणे खून केला.

काल(शनिवार) दिनांक 07/07/2018 रोजी रात्री 11 ते 11.30 वा. सुमारास 40 ते 50 नक्षलवादी इसरु पोटावी याच्या घरी येवून त्याला मारहाण करत सोबत घेऊन निघाले. यावेळी इसरुचे वडील नामे चैतु पोटावी, भाऊ बिजू, पत्नी जयवंती, मुले रमेश, आकाश, अक्षय यांनी नक्षलवाद्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना नक्षल्यानी दमदाटी व मारहाण केली.

Web Title: Naxalites killed the innocent tribal youth in gadchiroli