नक्षल्यांनी केली नवनिर्माण रस्त्याच्या बांधकामावरील वाहनांची जाळपोळ

एटापल्ली तालुक्यातील घटना
नक्षल्यांनी जाळलेली वाहने
नक्षल्यांनी जाळलेली वाहनेSakal

गडचिरोली - एटापल्ली तालुक्यात येत असलेल्या हालेवारा पोलिस मदत केंद्राअंतर्गत नवनिर्माण करण्यात येणाऱ्या रस्त्याच्या बांधकामावरील वाहनांची नक्षलवाद्यांनी जाळपोळ केल्याची घटना उघडकीस आली आहे.

मवेली ते मोहुर्ली या नवनिर्माण करण्यात येणाऱ्या रस्त्याचे बांधकाम वल्लभानी कंन्ट्रक्शन प्रा. लि. मार्फत केले जात होते. मात्र अचानक मध्यरात्रीच्या वेळी नक्षल बांधकाम स्थळी दाखल झाले. स्थानिक कर्मचाऱ्याला झोपेतून उठविले. त्यानंतर काही कळायच्या आत नक्षल्यांनी उभ्या असलेल्या वाहनांना लक्ष्य करीत वाहनांची जाळपोळ केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या जाळपोळीत दोन पोकलेन ,एक ट्रॅक्टर, एक ग्रेडर, एक ट्रकचा समावेश असून अंदाजीत अडीच कोटींचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. जाळपोळीची माहिती पोलिस विभागाला प्राप्त होताच घटनास्थळ गाठून अधिक तपास करण्यात येत असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.

पोलिसांच्या तपासानंतर नेमके किती रुपयांचे नुकसान झाले हे तपासातून निष्पन्न होणार आहे. झालेल्या घटनेसंदर्भात पोलिस विभागाला विचारणा केली असता घटनेला दुजोरा दिलेला आहे. मात्र तपासाशिवाय बोलता येणार नसल्याने पोलिस विभागाने स्पष्ट केले आहे . नक्षल्यांनी दोन दिवसांपूर्वी याच हालेवारा पोलिस मदत केंद्रातील एका व्यक्तीची हत्या केल्यानंतर ही दुसरी घटना घडवून आणल्याने ग्रामीण भागांत नागरिकांत दहशत निर्माण झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com