नक्षलवाद्यांनी केला गाव पाटलाचा खून

एटापल्ली तालुक्यातील डोद्दूर गावचे पोलिस पाटील कुल्ले वंजा कोवासी यांचा नक्षलवाद्यांनी खून केल्याची घटना मंगळवार (ता. २४) सकाळी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
murder
murdercrime
Summary

एटापल्ली तालुक्यातील डोद्दूर गावचे पोलिस पाटील कुल्ले वंजा कोवासी यांचा नक्षलवाद्यांनी खून केल्याची घटना मंगळवार (ता. २४) सकाळी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

एटापल्ली (जि. गडचिरोली) - एटापल्ली तालुक्यातील डोद्दूर गावचे पोलिस पाटील कुल्ले वंजा कोवासी यांचा नक्षलवाद्यांनी खून केल्याची घटना मंगळवार (ता. २४) सकाळी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, नक्षलवाद्यांनी भामरागड व एटापल्ली या दोन तालुक्यांत धुमाकूळ घातला असून काही दिवसांपूर्वीच रस्त्यांच्या कामावरील वाहने जाळून दहशत निर्माण केली होती.

सोमवार (ता. २३) रात्री नऊ वाजताच्या सुमारास डोद्दुर येथील गाव पाटील कुल्ले वंजा कोवासी हे डोद्दूर पत्ता फडीवर असताना ४० ते ५० नक्षलवादी तिथे आले आणि ते जबरदस्तीने पोलिस पाटलांना घेऊन गेले. त्यानंतर कोवासी यांना बेदम मारहाण करण्यात आली. डोद्दूर ते वटेली कच्च्या रस्त्यावर नेऊन कुल्ले कोवासी यांची गोळी झाळून हत्या केली. त्यानंतर कोवासी यांचा मृतदेह रस्त्यावर आणून ठेवला. पोलीस खबरी असल्याच्या संशयावरून हत्या करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. नक्षल्यांनी हत्या केल्याची माहिती त्यांचा मुलगा किशोर कुल्ले कोवासी व १५ ते २० सहकाऱ्यांनी पोलिस मदत केंद्रात येउन दिली. या घटनेमुळे पुन्हा एकदा या परिसरात दहशत व भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com