पोलिस चकमकीत माओवादी ठार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 मार्च 2018

एटापल्ली (जि. गडचिरोली) : तालुक्‍यातील कोटमी पोलिस स्टेशन हद्दितील हुमडी जंगल परिसरात पोलिस व माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक पुरुष माओवादी ठार झाला. शुक्रवारी (ता. 30) सायंकाळी हुमडी जंगलात गडचिरोली पोलिसांचे सी-60 जवान नक्षलविरोधी शोधअभियान राबवित असताना दबा धरून बसलेल्या माओवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी जोरदार प्रतिउत्तर दिल्याने वाढता दबाव पाहून माओवादी घनदाट जंगलाचा फायदा घेऊन पसार झाले. घटनास्थळाची पाहणी केली असता एका पुरुष माओवाद्याचा मृतदेह आढळून आला. तसेच दोन रायफली व नक्षली साहित्य सापडले.

एटापल्ली (जि. गडचिरोली) : तालुक्‍यातील कोटमी पोलिस स्टेशन हद्दितील हुमडी जंगल परिसरात पोलिस व माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक पुरुष माओवादी ठार झाला. शुक्रवारी (ता. 30) सायंकाळी हुमडी जंगलात गडचिरोली पोलिसांचे सी-60 जवान नक्षलविरोधी शोधअभियान राबवित असताना दबा धरून बसलेल्या माओवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी जोरदार प्रतिउत्तर दिल्याने वाढता दबाव पाहून माओवादी घनदाट जंगलाचा फायदा घेऊन पसार झाले. घटनास्थळाची पाहणी केली असता एका पुरुष माओवाद्याचा मृतदेह आढळून आला. तसेच दोन रायफली व नक्षली साहित्य सापडले. गडचिरोली जिल्हा पोलिस मुख्यालयातील आत्मसमर्पित माओवाद्यांमार्फत मृत माओवाद्याची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Web Title: Naxlite shot dead

टॅग्स