नागपूरमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 ऑक्टोबर 2016

नागपूर - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नागपूर विभागीय पदाधिकाऱ्यांचा मेळावा उद्या गुरुवारी राष्ट्रावादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी एक वाजता आमदार निवास परिसरात होणार आहे. महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मेळावा होत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून सर्वच राजकीय पक्षांचे याकडे लक्ष लागले आहे. 

मेळाव्यास माजी केंद्रीय मंत्री खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, जयदत्त क्षीरसागर, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हेसुद्धा उपस्थित राहणार आहेत. नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोलीतून हजारो पदाधिकारी मेळाव्यासाठी येणार असून जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केले. विशेष म्हणजे शरद पवार दिवसभर शहरात राहणार आहेत. या दरम्यान ते विदर्भातील प्रमुख नेते व पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत. यात ते काय संकेत देतात याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: ncp campaign in nagpur