नगर परिषद निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

गोंदिया -  नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत एकमेकांविरुद्ध लढणाऱ्या कॉंग्रेस व राष्ट्रवादीने या निवडणुकीतील निकालाचा राजकीय बोध घेतला. आगामी नगर परिषद निवडणूक आता हे दोन्ही पक्ष एकत्रित लढणार असल्याचे अधिकृत संकेत दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी दिले.

गोंदिया -  नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत एकमेकांविरुद्ध लढणाऱ्या कॉंग्रेस व राष्ट्रवादीने या निवडणुकीतील निकालाचा राजकीय बोध घेतला. आगामी नगर परिषद निवडणूक आता हे दोन्ही पक्ष एकत्रित लढणार असल्याचे अधिकृत संकेत दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी दिले.

अशोक ऊर्फ गप्पू गुप्ता हे आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार राहतील. या निमित्ताने बुधवारी अशोक गुप्ता यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक हॉटेल आहार येथे घेण्यात आली. उपस्थित पदाधिकाऱ्यांतर्फे खासदार प्रफुल्ल पटेल, राजेंद्र जैन, आमदार गोपालदास अग्रवाल यांनी घेतलेल्या आघाडीच्या निर्णयाचे या वेळी स्वागत करण्यात आले. विकासाचा अजेंडा ठेवून गोंदिया व तिरोडा येथील नगर परिषद निवडणुकींना दोन्ही पक्ष सामोरे जातील, असे या वेळी ठरविण्यात आले. बैठकीला अशोक ऊर्फ गप्पू गुप्ता, मनोहर वालदे, मयूर जडेजा, विनायक खैरे, राधा अग्रहरी, विनोद पंधरे, योगेश बन्सोड, रमेश कुरील, मोहंमद खली, आशा पाटील, मुकेश मोतानी, विनीत शहारे, अर्चना देशमुख, पूजा पटले, उमेश्‍वरी चुटे, महेश दखने, सौरव रोकडे, रोहित भलावी, दत्ता गजभिये, कुंदा पंचबुद्धे, नानू मुदलीयार, संजय राय, त्रिलोक तुरकर आदींची उपस्थिती होती.

भाजप-शिवसेना युतीचे काय?
राज्यात अन्य ठिकाणी झालेल्या नगर परिषद निवडणूक निकालानंतर कॉंग्रेस, राष्ट्रवादी राजकीय बोध घेत आघाडीचा निर्णय उर्वरित ठिकाणी घेतल्याचे दिसून येते. त्याचवेळी राज्यात एकत्रित सत्तेत असलेल्या भाजप-शिवसेना युतीचे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मात्र "एकला चलो रे' धोरण कायम असल्याचे दिसून येते. स्थानिक पातळीवरील राजकीय हालचाली पाहता, भाजपने प्रचाराची सुरुवात केव्हाचीच केली असून, अद्यापतरी स्थानिक भाजपने शिवसेनेला सोबत घेण्याचे कोणतेही संकेत दिलेले नाहीत.

Web Title: The NCP-Congress alliance Municipal Council elections