राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख पिता-पुत्रांना अटक व सुटका

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

जलालखेडा - माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख व त्यांचे पुत्र सलील  देशमुख यांना तूर खरेदी आंदोलन प्रकरणी नरखेड पोलिसांनी सोमवारी अटक केली.  न्यायालयातून दोघांनाही जामीन मिळाला आहे. मागील वर्षी तूर खरेदी केंद्र सुरू करावे अशी मागणी करीत आंदोलन केले होते. 

जलालखेडा - माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख व त्यांचे पुत्र सलील  देशमुख यांना तूर खरेदी आंदोलन प्रकरणी नरखेड पोलिसांनी सोमवारी अटक केली.  न्यायालयातून दोघांनाही जामीन मिळाला आहे. मागील वर्षी तूर खरेदी केंद्र सुरू करावे अशी मागणी करीत आंदोलन केले होते. 

नरखेड येथील शासकीय खरेदी केंद्र हंगाम शिल्लक असताना बंद करण्यात आले होते. तूर खरेदी सुरू करावी अशी मागणी करीत अनिल देशमुख व सलील देशमुख यांनी सरकारची अंत्ययात्रा काढून पुतळ्याचे दहन केले होते. त्याच प्रकरणात नरखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचे दोषारोपत्र नरखेड पोलिसांनी सोमवारी अटक करून नरखेड न्यायालयासमोर हजर केले. येथे अनिल देशमुख व सलील देशमुख यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांची दहा हजार रुपयांच्या जातमुचलक्‍यावर सुटका करण्यात आली. या आंदोलनात अनिल देशमुख, सलील देशमुख, सतीश शिंदे, नरेश अरसडे, संजय चरडे, नंदलाल मोवाडे, वैभव दळवी, बबनराव लोहे, अनिल साठोणे, मनीष फुके, सुरेश बांदरे, नरेंद्र रहाटे, सुदर्शन नवघरे, सुरेश रेवतकर, गोपाल टेकाडे, जाकीर शेख, उज्वल भोयर, राहुल गजबे, हरीकांत माळोदे, ईश्वर रेवतकर, मझर खान त्यांच्यावर गुन्हे दाखल होते.

भाजप सरकार हे शेतकरीविरोधी आहे. शेतकऱ्यांचा कोणताच प्रश्‍न सरकार गांभीर्याने घेत नाही. मग ते कर्जमाफी असो किंवा तूर, हरभरा खरेदी असो. आश्वासन देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला  पाने पुसण्याचे काम राज्यकर्ते करीत आहेत. लोकशाही मार्गाने आंदोलन केले होते. परंतु, आंदोलकांचा आवाज दाबण्यासाठी गुन्हे दाखल करण्यात आले. 
- अनिल देशमुख, माजी मंत्री, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस

Web Title: NCP leader Anil Deshmukh arrested and rescued