राष्ट्रवादी काँग्रेस तेलंगणमध्येही लढणार

NCP
NCP

गडचिरोली - तेलंगण राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस तयारीनिशी उतरणार आहे. यामुळे गोवा, कर्नाटकनंतर आता तेलंगणमध्येही राष्ट्रवादी काँग्रेस आपला जनाधार वाढविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट  झाले आहे.

तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी विधानसभा बरखास्त केली आहे. यामुळे येत्या नोव्हेंबर महिन्यातच येथे विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्‍यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने गोवा व कर्नाटकमध्ये काँग्रेसशी आघाडी न करता स्वतंत्रपणे निवडणूक लढविली होती. गोव्यात त्यांचा एक आमदार आहे. कर्नाटकमध्ये १४ जागा लढविल्या होत्या, परंतु उमेदवार जिंकू शकला नाही. आता तेलंगणातही जनाधार वाढविण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतला आहे. यासाठी प्रभारी म्हणून माजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडे जबाबदारी सोपविली आहे.

आत्राम हे सिरोंचा मतदारसंघातून तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांचा मतदारसंघाला तेलंगणाला लागून आहे. त्यांचे तेलुगू भाषेवरही प्रभुत्व असून सिरोंचा, अहेरी, आल्लापल्ली या भागांत मोठ्या प्रमाणावर तेलुगू भाषिक आहेत. तेलंगणामध्ये विधानसभेच्या ११९ जागा आहेत. त्यापैकी किमान १५ मतदारसंघ महाराष्ट्राच्या जवळ आहेत. या मतदारसंघांवरच राष्ट्रवादी काँग्रेस लक्ष केंद्रीत करणार असल्याचे समजते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com