राष्ट्रवादीची ताकत दाखवू- निमकर

संदीप रायपुरे
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

शासनाच्या हेकेखोर धोरणामुळे चहुकडे संतापच संताप आहे. शेतकरी, बेरोजगार, व्यावसायीक सारेच त्रस्त आहेत. करोडो तरूणांना रोजगार देण्याचा वादा करणारे हे फसवे सरकार आहे.

गोंडपिपरी- शासनाच्या हेकेखोर धोरणामुळे चहुकडे संतापच संताप आहे. शेतकरी, बेरोजगार, व्यावसायीक सारेच त्रस्त आहेत. करोडो तरूणांना रोजगार देण्याचा वादा करणारे हे फसवे सरकार आहे.

देशात राज्यात अराजकता माजल्यासारखीच स्थिती आहे. अशा सरकारविरोधात हल्लाबोल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस 5 सप्टेंबर रोजी राजुऱ्यामध्ये आपली ताकद दाखवेल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश महासचिव सुदर्शन निमकर यांनी दिला.

गोंडपिपरी पक्षाचा कार्यकर्ता मेळावा काल (ता.27) घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. येत्या 5 तारखेला राजूरा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हल्लाबोल मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे, यांच्यासह वरिष्ठ नेतेमंडळी, उपस्थित असणार आहेत. या मोर्चाला नागरिकांचा व कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळावा यासाठी निमकर क्षेत्र पिंजून काढीत आहेत. आज गोंडपिपरीत त्यांनी मेळावा घेतला.

केशवराव ठाकरे, मनोज धानोरकर, सूरज माडूरवार, नितेश मेश्राम, कुणाल गायकवाड, शामा चौधरी, शंकर उपासे, मारोती झाड़े, सुधाकर गौरकर, रमेश बोरकुटे, पुरषोत्तम हिंगाने, मारोती भोयर, विलास कुट्टरमारे, बाबूराव बोंडे, अशोक चन्देकर, प्रणय उमरे, अजय उमरे, केतन भोयर, समीर शेख, मयूर पोहनकर, सुरेश भसारकर, आकाश कुलमेथे, विलास सुर, सन्तोष धोडरे अादींची यावेळी उपस्थिती होती. यावेळी, नीतिन भटरकर यांच्या मार्गदर्शनात, सूरज माडूरवार यांच्या नेतृतवात गोंड़पिपरी येथील समीर शेख, झाकिर शेक, सोनू मेश्राम, पंकज सोयाम, केतन भोयर, नैतेश मेश्राम यांनी केला प्रवेश केला.

Web Title: NCP will show strength says Nimkar