कामठीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस करणार दावा

वीरेंद्रकुमार जोगी : सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जून 2019

नागपूर : जिल्ह्यात सध्या एकही आमदार नसताना राष्ट्रवादी कॉंग्रेसने आघाडीत कामठी विधानसभेवर दावा केला आहे. आघाडीत काटोल आणि हिंगणा राष्ट्रवादीकडे असून आणखी एका मतदारसंघाची मागणी त्यांनी केली आहे. या संदर्भात उद्या शुक्रवारी (ता. 21) मुंबई येथे शरद पवार यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीत कामठी मतदारसंघ मागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.विधानसभा निवडणुकीसाठी नागपूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. आघाडी झाल्यास काटोल, हिंगणा यासह कामठी किंवा उमरेड विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी कॉंग्रेस दावा ठोकणार आहे.

नागपूर : जिल्ह्यात सध्या एकही आमदार नसताना राष्ट्रवादी कॉंग्रेसने आघाडीत कामठी विधानसभेवर दावा केला आहे. आघाडीत काटोल आणि हिंगणा राष्ट्रवादीकडे असून आणखी एका मतदारसंघाची मागणी त्यांनी केली आहे. या संदर्भात उद्या शुक्रवारी (ता. 21) मुंबई येथे शरद पवार यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीत कामठी मतदारसंघ मागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.विधानसभा निवडणुकीसाठी नागपूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. आघाडी झाल्यास काटोल, हिंगणा यासह कामठी किंवा उमरेड विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी कॉंग्रेस दावा ठोकणार आहे. उद्या शुक्रवारी नागपूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्षाच्या ताकदीची चाचपणी खुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार करणार आहेत. यावेळी ही मागणी केली जाणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसची बैठक उद्या शुक्रवारी मुंबईत होणार आहे. जिल्ह्यातील सर्वच प्रमुख राष्ट्रवादीचे नेते, जिल्हा कार्यकारिणी तसेच तालुकाध्यक्ष मुंबईकडे आज गुरुवारी रवाना झाले. आघाडीत फिफ्टी-फिफ्टीच्या फॉर्म्युल्यावर भर देण्यात येणार असून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सहापैकी तीन जागांवर दावा करण्याची शक्‍यता आहे. काटोल व हिंगणा या जागांवर राकॉंचे उमेदवार लढत असून यावेळी आणखी एक जागा वाढवून मागणार आहेत. विधानसभेच्या मागील तीन निवडणुकीत कामठीमध्ये तर दोन निवडणुकांत उमरेड मतदारसंघात कॉंग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला आहे. यामुळे कामठी किंवा उमरेड यापैकी एका मतदारसंघासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आग्रही आहेत. उमरेड मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने कामठी मतदारसंघ मिळावा यावर राष्ट्रवादीचा आग्रह आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे जिल्ह्याध्यक्ष शिवराज (बाबा) गुजर हे कामठी मतदारसंघातील मौदा तालुक्‍यातील आहेत. भाजपचे आमदार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे याच्या विरोधात स्थानिक आक्रमक नेत्याला उमेदवारी देण्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा भर असेल.
राष्ट्रवादीकडे दोनच जागा
आघाडीत सध्या काटोल आणि हिंगणा हे दोनच मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहेत. मागील निवडणुकीत काटोलचे अनिल देशमुख यांचा त्यांचेच पुतणे आशीष देशमुख यांनी पराभव केला होता. हिंगण्यात रमेश बंग यांचा सलग दोनवेळा पराभव झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP's claim to Kamthi