राष्ट्रवादी काँग्रेसचा आज जन आक्रोश मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 ऑक्टोबर 2018

अकोला : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शनिवार, 20 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
 गांधी-जवाहर बाग येथून सुरू होणाऱ्या मोर्चाचे नेतृत्व माजी मंत्री गुलाबराव गावंडे, प्रदेश उपाध्यक्ष संतोष कोरपे, माजी आमदार तुकाराम बिडकर, माजी आमदार भैय्यासाहेब तिडके, माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत पिसे पाटील, सभापती पुंडलीकराव अरबट, डॉ. आशाताई मिरगे, प्रा. विश्वनाथ कांबळे, जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे आदी करणार आहे.

याशिवाय रमेशदादा हिंगणकर, सय्यद युसूफ अली, गजानन इंगळे, मंदाताई देशमुख, प्रा.विजय उजवणे, राजू बोचे, माजी नगरसेवक फजलू पैलवान सर्व ज्येष्ठ पदाधिकारी व सर्व फ्रंटल व सेल यांचा उपस्थितीत सरकार विरोधात निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याचे गावंडे यांनी सांगितले. मोर्चाला सकाळी 11 वाजता गांधी जवाहर बाग येथून सुरुवात होईल. या मोर्चाला जास्तित जास्त संख्येने शेतकऱ्यांनी उपस्थित राहून भाजप-शिवसेना युती सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्याचे आवाहन संग्राम गावंडे यांनी केले.

Web Title: NCPs Jan Aakrosh Morcha today