नागपूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसची शिवस्वराज्य यात्रेचे उद्या बुधवारी (ता.11) आगमन होत असून नागपूरमध्ये दोन सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. दत्तात्रयनगर येथे दुपारी साडेचार वाजता तर सायंकाळी साडेसहा वाजता वर्धमाननगर येथील घनसन सभागृहात सभा होणार आहेत.
तत्पूर्वी, सकाळी 11 वाजता अनिल देशमुख यांच्या काटोल मतदारसंघातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात सभा होईल. सर्व कार्यक्रमांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अभिनेता खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, माजी गृहमंत्री अजित पवार, महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, अमोल मिटकरी, माजी मंत्री अनिल देशमुख, रमेश बंग, अल्पसंख्याक राष्ट्रीय अध्यक्ष मा. शब्बीर अहमद विद्रोही, प्रदेश सरचिटणीस प्रवीण कुंटे, शहराध्यक्ष अनिल अहीरकर, कार्याध्यक्ष जावेद हबीब, शहर उपाध्यक्ष ज्वाला धोटे, नितीन देशमुख, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे आदी यावेळी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. |
|