बोरी शहरातील वाहतूक कोंडीकडे पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष; नागरिकांना प्रचंड त्रास

बसथांबा परिसरात वाहतुकीची कोंडी
बोरी शहरातील वाहतूक कोंडीकडे पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष; नागरिकांना प्रचंड त्रास

बोरी: खासगी प्रवासी वाहतूक करणारी वाहने बसथांबा परिसरात उभी केली जात आहेत. यावर कळस म्हणजे फळांचे हातगाडेही रस्त्यावर असतात. त्यामुळे रस्ता अरुंद झाला असून, वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे अपघातही होण्याची शक्यता आहे. पण, याकडे ग्रामपंचायतीसह पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

बोरी परिसरात खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या अधिक आहे. यात जीप, ऑटोरिक्षांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवून वाहतूक केली जात आहे. सध्या लग्नसराई असल्याने मोठ्या प्रमाणावर प्रवासी परगावी ये-जा करीत आहेत.

बोरी शहरातील वाहतूक कोंडीकडे पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष; नागरिकांना प्रचंड त्रास
3 जिल्ह्याची वरदायिनी उजनी मायनसमध्ये! यंदा महिनाभर अगोदर धरणाने गाठला तळ; आता पाणी फक्त पिण्यासाठीच

बोरी येथील बाजारपेठ मोठी असल्याने पंचक्रोशीतील गावांतील ग्रामस्थांचा नियमित संपर्क असल्याने सहाजिकच वाहतूक जास्त आहे. खासगी प्रवासी वाहतूक करणारे वाहन चालक आपली वाहने बसस्थानक परिसरात बेशिस्तीत उभी करीत आहेत. त्यामुळे एसटी बसला बसथांबा परिसरात जागाच नाही.

बोरी शहरातील वाहतूक कोंडीकडे पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष; नागरिकांना प्रचंड त्रास
Sambhaji Nagar: विद्यापीठात बेवारस मृतदेह सापडल्याच्या घटनेनंतर विद्यापीठाने घेतला मोठा निर्णय

परिणामी, बस चालक प्रवासी निवारा सोडून इतरत्र बस उभी करीत आहेत. यामुळे वाहतूक कोंडीही होत आहे. बसथांबा परिसरात फळे विकणारी, पाणीपुरी, थंड पेय विकणारे मोठ्या प्रमाणात हातगाडे रस्त्यावर उभी करत आहेत.

फळे विकत घेण्यासाठी ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन उभे राहवे लागते. कधी कुठून वाहन येईल याचा नेम नाही. सध्या बसथांबा परिसरात रस्त्याचे काम सुरू असून, जागोजागी राहिलेल्या अर्धवट कामामुळे रस्ता वाहतुकीसाठी अरुंद झालेला आहे. त्यामुळे याकडे ग्रामपंचायतीसह पोलिसांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com