कोरोना, मेंदूज्वर झालेली विद्यार्थिनी कोमातून परतली

कोरोना, मेंदूज्वर झालेली विद्यार्थिनी कोमातून परतली

अमरावती : कोविड पॉझिटिव्ह (Covid positive) म्हणून रुग्णालयात उपचारार्थ दाखल झाल्यावर मेंदूज्वर (Meningitis) व इतर आजारांची लक्षणे आढळून आलेल्या विद्यार्थिनीला आरोग्य विभागाच्या कार्यतत्पर उपचारामुळे पुनर्जन्म मिळाला आहे. उपचारादरम्यान ही विद्यार्थिनी पंधरा दिवस कोमात होती. डॉक्टरांच्या देखरेखीत ऑक्सिजन पुरवठा, प्रयोगशाळेत विविध तपासण्या व त्यानुसार औषधोपचारामुळे आज ती पूर्णतः बरी होऊन स्वत:च्या घरी परतली आहे. आपल्या लेकीला पुनर्जन्म मिळाल्याने वैद्यकीय सेवा देवदूत ठरल्याची प्रतिक्रिया तिच्या कुटुंबीय व नागरिकांकडून व्यक्त होत आहे. (Neha-from-Amravati-got-reborn)

अमरावती येथील रहिवासी इयत्ता दहावीची नेहा ही विद्यार्थिनी काही दिवसांपूर्वी घरी अचानक भोवळ येऊन कोसळली. कुटुंबीयांनी तिला तातडीने डॉक्टरांकडे आणले. त्यावेळी तिला सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये भरती करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. तिची गंभीर प्रकृती लक्षात घेऊन सुपरस्पेशालिटी रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी तिला दाखल करून घेत तत्काळ उपचार सुरू केले. तिला कोविड-१९ ची बाधा झाल्याचे आढळल्याने प्रथमत: तिच्यावर उपचार करण्यात आले.

कोरोना, मेंदूज्वर झालेली विद्यार्थिनी कोमातून परतली
राष्ट्रवादीला काँग्रेसकडून भीती; आघाडी तुटण्याची शक्यता

दरम्यान, तिचा ताप वाढू लागला होता. शरीराचे तापमान १०४ पर्यंत पोहोचले होते. हे लक्षात घेऊन मेंदूचा सिटी स्कॅन तसेच मेंदू व पाठीतील पाण्याची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली. तपासणीअंती मेंदूज्वर या आजाराचे निदान झाले. त्यानुसार तिच्यावर उपचार करण्यात आले. ती सलग पंधरा दिवस कोमात होती. अशास्थितीतही डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून तिला कोमातून बाहेर काढले. आता तिची प्रकृती सुधारली असून, तिला आज सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधून घरी परतण्याची परवानगी मिळाली आहे.

कोविडबाधित व मेंदूज्वरासह इतर आजारांची लक्षणे असलेल्या कोमात गेलेली बालिका पूर्णतः बरी झाली. डॉक्टर, पारिचारिका व इतर स्टाफच्या एकत्रित प्रयत्नांतून तिला पुनर्जन्म मिळाला आहे.
- डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्यचिकित्सक, अमरावती

(Neha-from-Amravati-got-reborn)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com