काका गेले कामाला, काकू होती आजारी अन् पुतण्याने ओलांडली सीमा...

amravati crime
amravati crime

चांदूरबाजार (जि. अमरावती) : चांदूरबाजार तालुक्‍यातील शिरसगावबंड येथे शुक्रवारी (ता. 17) घरात आढळलेल्या महिलेच्या मृत्यूचे रहस्य रविवारी (ता. 19) रात्री उलगडले. स्वत:च्या पुतण्यानेच काकूचा खून केल्याची कबुली पोलिसांपुढे दिली.


सारंग माधवराव झटाले (वय 24 रा. शिरसगावबंड) असे अटक युवकाचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. सोमवारी (ता. 20) न्यायालयासमोर त्याला हजर केले. न्यायालयाने सारंगला गुरुवारपर्यंत (ता. 23) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. 17 जानेवारी 2020 रोजी संगीता विकास झटाले (वय 40 रा. शिरसगावबंड) ही महिला घरात मृतावस्थेत पडून असल्याची बाब मुलगा पवन विकास झटाले यांच्या निदर्शनात आली.

घटनेच्या वेळी मुलगा कॅटरिंगच्या कामावरून परत आला होता. मुलगी लीना महाविद्यालयात, तर, पती विकास रामराव झटाले हे शेतीकामासाठी घराबाहेर असताना ही घटना घडली होती. पोलिसांच्या मते सदर महिला काही दिवसांपासून आजारी होती. काही जणांसोबत तिचा वादही व्हायचा. घटनेच्या दिवशी सारंग झटाले सोबत तिचा वाद झाल्यावर सारंगने रागाच्या भरात चाकूने वार करून काकू संगीता हिचा खून केला. त्यानंतर तो पसार झाला.


महिलेच्या मृत्यूचे रहस्य तिसऱ्या दिवशी उलगडले
चांदूरबाजार पोलिसांनी सारंग यास अमरावती शहरातील शेगावनाका परिसरातून अटक केली, असे पोलिस निरीक्षक उदयसिंग सोळुंके यांनी सांगितले. याप्रकरणाचा प्रारंभिक तपास सहायक पोलिस निरीक्षक गिरसावळे यांनी केला. त्यानंतर घटनेचा सारंगसोबत नेमका काय सबंध होता, ही बाब सहायक पोलिस निरीक्षक दाभाडे, सहायक पोलिस निरीक्षक अशोक कांबळे, पोलिस शिपाई विजय अमृतकर, प्रशांत भटकर, पंकज फाटे यांच्या पथकाने तपासली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com