विधानभवनातील नवी इमारत हिवाळी अधिवेशनापूर्वी उभी होणार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 जून 2019

नागपूर : मुंबई येथे सुरू असलेले युती सरकारचे हे अखेरचे अधिवेशन असून पुढील हिवाळी अधिवेशन नागपुरात होणार आहे. गेल्यावर्षी नागपुरात झालेल्या पावसाळी अधिवेशनात पाणी तुंबल्याने एक दिवस अधिवेशन बंद ठेवण्याची नामुष्की सरकारवर आली होती. त्याचवेळी येथील विधानभवनाच्या नवीन इमारतीचा पायाभरणी कार्यक्रम घेण्यात आला होता. आता त्या इमारतीच्या बांधकामाने गती घेतली असून येत्या हिवाळी अधिवेशनापूर्वी ही इमारत पूर्णत्वास जाईल. म्हणजे नवीन येणाऱ्या सरकारच्या अधिवेशनासाठी सज्ज राहणार आहे.

विधानभवनातील विधानसभा आणि विधान परिषद सभागृहादरम्यान एक इमारत होती. अधिवेशनादरम्यान या इमारतीचा कॅंटीनसाठी उपयोग करण्यात येत होता. ही इमारत तोडून येथे तीन माळ्यांची इमारत तयार करण्यात येत आहे. मागील पावसाळी अधिवेशनादरम्यान या नव्या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. या इमारतीचे प्रत्यक्ष काम एक डिसेंबर 2018 पासून सुरू झाले. तीन माळ्यांच्या इमारतीत पहिले दोन माळे मंत्र्यांसाठी असणार आहेत. प्रत्येक माळ्यावर सहाप्रमाणे 12 कॅबिन (कक्ष) असणार आहेत. मंत्र्यांसोबत त्यांच्या खासगी सहाय्यकांसाठीही व्यवस्था करण्यात येणार आहे. विधान परिषद आणि विधानसभा असलेल्या इमारतीत मंत्र्यांकरिता कक्ष आहेत. मात्र, हे कक्ष फारच लहान आहेत. येथे स्वतंत्र दालनसुद्धा नव्हते. या नवीन इमारतीत स्वतंत्र दालनाची व्यवस्था केली आहे. तर तिसऱ्या माळ्यावर कॅंटीन राहणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New Building in the Legislative Assembly Before the Winter Session