लोकसभेसाठी नवा उमेदवार द्यावा; काँग्रेसचे तीन ठराव

लोकसभेसाठी नवा उमेदवार द्यावा; काँग्रेसचे तीन ठराव

नागपूर - मुत्तेमवार समर्थक विलास मुत्तेमवार यांनाच काँग्रेसने लोकसभेची उमेदवारी द्यावी याकरिता दिल्लीत नेत्यांच्या भेटीगाठी घेत असतानाच आज नागपूरमध्ये त्यांच्या विरोधकांनी बैठक घेऊन नवा उमेदवार देण्याची मागणी केला. या बैठकीत तीन ठराव पारित करण्यात आलेत. यात सतीश चतुर्वेदी यांचे निलंबन रद्द करावे आणि शहराध्यक्ष विकास ठाकरे यांना बदलविण्यात यावे, याचा समावेश आहे.

लोकसभेची निवडणूक जवळ येऊन ठेपल्याने उमेदवारीसाठी शहरातील काँग्रेसचे दोन्ही गट सरसावले आहेत. विलास मुत्तेमवार मागील निवडणुकीत तब्बल पावणेतीन लाखांच्या मताधिक्‍याने पराभूत झाले. शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात महापालिकेची निवडणूक झाली. यात ते स्वतःही पडले व काँग्रेसचा दारुण पराभव झाला. त्यामुळे आता मुत्तेमवार यांच्याऐवजी दुसरा उमेदवार द्यावा. नितीन राऊत, सतीश चतुर्वेदी, प्रफुल्ल गुडधे, गेव्ह आवारी, अशोक धवड, अनीस अहमद यांच्यामधून कोणालाही उमेदवारी द्यावी. सतीश चतुर्वेदी विदर्भातील ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना बाहेर ठेवणे काँग्रेसचे नुकसान आहे. त्यामुळे त्यांना सन्मानाने परत पक्षात आणावे. शहरात सदस्य नोंदणी झाल्यानंतही शहराध्यक्षाची निवड झालेली नाही. विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात काँग्रेस सर्वच निवडणुकीत पराभूत झाली आहे. त्यामुळे शहराध्यक्ष ताबडतोब बदलवण्यात यावा, असे तीन ठराव या बैठकीत पारित करण्यात आले. माजी नगरसेवक व मनपातील सत्तापक्षनेते यशवंत कुंभलकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यास सुभाष खोडे, विजय बाभरे, किशोर जिचकार, कमलेश चौधरी, आयशा उइके, जुल्फीकार भुट्टो, परसराम मानवटकर, दिनेश यादव, नारायण शेळके, मनोज गावंडे, राकेश निकोसे, पुरुषोत्तम हजारे, हर्षला साबळे, कमलेश समर्थ, संजय दुबे, सुभाष भोयर, अरुण डवरे, नाना झोडे, सिंधू उइके, सुनंदा राऊत, माया नांदूरकर आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com