पावसाने केली नवीन बांधकामाची पोलखोल

गोरेगाव ः रस्त्यावर साचलेले पावसाचे पाणी.
गोरेगाव ः रस्त्यावर साचलेले पावसाचे पाणी.

गोरेगाव (जि. गोंदिया) ः शहरातील कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांची पावसाने पोलखोल केली आहे. निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून केलेल्या बांधकामाचा हा उत्कृष्ट नमुनाच म्हणावा लागेल.
सोमवारी (ता. एक) आलेल्या पावसात शहरातील नवनिर्मित सिमेंट नाली बांधकाम वाहून गेले. जागोजागी पाणी साचल्याने शहरवासींना त्रास सहन करावा लागत आहे. नगरपंचायतीने अनेक कंट्रक्‍शन कंपनींना कामाचे कंत्राट दिले आहे. कंत्राटदारांनी एक महिन्यापूर्वी प्रभाग क्रमांक चारमध्ये 100 मीटर लांबीची सिमेंट नाली बांधली. या नाली बांधकामात कंट्रक्‍शन कंपनीने निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले आहे. असे असताना नगरपंचायतीच्या अभियंत्यांनी या सिमेंट नाली बांधकामास योग्य बांधकाम असल्याचे प्रमाणपत्र दिले. परंतु, पावसाने या कामाची पावती नजरेसमोर आणून दिली. त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 3 मध्ये 468 मीटर लांबीची सिमेंट नाली बांधकाम सुरू आहे. ही सिमेंट नाली वाहून गेली आहे. त्यामुळे नगरपंचायतीने चालू केलेल्या विकासकामांची पोलखोल झाली आहे. दरम्यान, निकृष्ट दर्जाच्या बांधकामाची चौकशी करून जलजमाव तत्काळ हटविण्यात यावा, अशी मागणी शहरवासींनी केली आहे.
शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. त्यामुळे जलजमाव होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. शहरातील कामाची पाहणी नगरपंचायत चमूकडून सुरू आहे. नाली बांधकाम व रस्ता बांधकामाबाबत तक्रारी आल्या आहेत. त्याची चौकशी करून कारवाई केली जाईल.
- आशीष बारेवार, नगराध्यक्ष, गोरेगाव.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com