नया डीसीपी बहोत डेंजर हैं !

Sand-Mafia
Sand-Mafia

नागपूर - ‘भाईयों... वो नया डीसीपी बहोत डेंजर हैं...दिघोरी से नहीं जाना...सिधा बेलतरोडी मार्ग से ट्रक निकाल लो... वहां सब सेट हैं.’ अशा प्रकारची व्हॉइस क्‍लिप वाळूतस्करांच्या व्हॉट्‌सॲप ग्रूपमधून सध्या वाऱ्याच्या वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वाळूतस्करांमध्ये असणारा पोलिस आयुक्‍तांचा दरारा आणि काही पोलिस कर्मचाऱ्यांचे वाळूमाफियांशी असलेले संबंधही उघडकीस आणले आहे.

गेल्या काही दिवसांपासून नागपूर शहर पोलिस दलातील झोन चारचे पोलिस आयुक्‍त नीलेश भरणे यांनी वाळूतस्करांवर धडाकेबाज कारवाई सुरू केली.  ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर पोलिसांनी वाळूतस्करांचा लगाम कसल्यामुळे पोलिसांचा वचक निर्माण झाला आहे. मात्र, या समस्येवरही काही बहाद्दर वाळूतस्करांनी तोडगा काढला आहे. काही पोलिस उपनिरीक्षक आणि कर्मचाऱ्यांना ‘सेट’ केले असून चोरून लपून वाळूतस्करी सुरू केली आहे.

डीसीपी भरणे यांनी दिघोरीत छापा घालत एका दिवशी २० ते २५ वाळूतस्करांवर कारवाई करीत वाळूचे ट्रक जप्त केले होते. त्यामुळे वाळू व्यावसायिकांना चांगलाच हादरा बसला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपुरातील वाळूतस्करांचा व्हॉट्‌सॲप ग्रूप आहे. त्यामध्ये केवळ ऑडिओ क्‍लिपने एकमेकांशी संवाद साधल्या जातो. गेल्या काही दिवसांपूर्वी एका रेती तस्कराने ‘नया डीसीपी बहोत डेंजर हैं. बेलतरोडी मार्ग से ट्रक जाने दो.’ असा व्हॉइस मॅसेज टाकला. तो मॅसेज एकाने थेट अनेक व्हॉट्‌सॲप ग्रूपवर पाठवला. त्यामुळे रेती तस्करांची बोबळी वळली. तसेच बेलतरोडी पोलिसांचे वाळूतस्करांशी असलेले संबंधही उघडकीस आले. आतापर्यंत डीसीपी भरणे यांनी दिघोरी, खरबी या परिसरात सापळे रचून ५२ ट्रक-टिप्परवर कारवाई केली आहे. 

दिघोरी आणि खरबी या परिसरात डीसीपी भरणे यांनी कारवाईस सुरुवात केल्यानंतर वाळूतस्कर आउटर रिंग रोड बेलतरोडी मार्गे वाळूचे ट्रक नेण्यास सांगतात. त्या परिसरात ‘टू स्टार’ आणि पथकाशी वाळूतस्कराची हातमिळवणी झालेली असते. चोरीच्या वाळूची तेथून बिनधास्तपणे तस्करी केली जाते, अशी माहिती आहे.

वाळू तस्करांवर विना रॉयल्टी, ओव्हर लोड किंवा वाहनावर चालान कारवाई एवढेच नव्हे तर आता थेट चोरीचे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. त्यामुळे वाळूतस्करी करणाऱ्यांची हयगय नाही. कारवाईचा धडाका कायम राहणार आहे. 
- नीलेश भरणे, पोलिस उपायुक्‍त, परिमंडळ-४

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com