
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी निश्चित करण्यात सर्वच पक्ष गुंतले आहेत. सोमवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने रविवारपर्यंत सर्वच पक्षांचे उमेदवार निश्चित होणार आहे. उमेदवार निश्चित करताना सर्वच पक्षांना स्थानिक आणि पार्सल उमेदवाराच्या वादाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे भाजप व वंचित आघाडीची उमेदवारी अद्याप निश्चित होऊ शकली नाही तर शिवसेना व काँग्रेस आघाडीमध्ये महाविकास विकास आघाडीचे घोडे पुढे सरकलेले नसल्याने उमेदवार संभ्रमात आहेत.
अकोला : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी निश्चित करण्यात सर्वच पक्ष गुंतले आहेत. सोमवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने रविवारपर्यंत सर्वच पक्षांचे उमेदवार निश्चित होणार आहे. उमेदवार निश्चित करताना सर्वच पक्षांना स्थानिक आणि पार्सल उमेदवाराच्या वादाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे भाजप व वंचित आघाडीची उमेदवारी अद्याप निश्चित होऊ शकली नाही तर शिवसेना व काँग्रेस आघाडीमध्ये महाविकास विकास आघाडीचे घोडे पुढे सरकलेले नसल्याने उमेदवार संभ्रमात आहेत.
अकोला जिल्हा परिषदेच्या 53 जागा व सात पंचायत समितीच्या 106 जागांसाठी 7 जानेवारी रोजी निवडणूक होणार आहे. त्यासाठी भाजप व वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्र लढण्याचे आधीच जाहीर केले आहे. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी राज्याप्रमाणेच जिल्ह्यातही महाविकास आघाडीच्या दृष्टीने चर्चा सुरू केली आहे. आतापर्यंत अकोला व नागपूर येथे दोनवेळा चर्चा झाली. या चर्चेत जागा वाटपावरून एकमत होऊ शकले नाही. याउलट कार्यकर्त्यांना बळ देण्याची भूमिका तिन्ही पक्षांनी घेतली. त्यामुळे शिवसेना स्वतंत्र लढणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. असे असले तरी उमेदवारी निश्चित करताना सर्वच पक्षांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. आरक्षणामुळे उमेदवारीबाबत निर्माण झालेला गुंता सोडविण्यासाठी पतीच्या पत्नी आणि पार्सल उमेदवारांबाबत चाचपणी केली जात आहे. त्यामुळे स्थानिक विरुद्ध पार्सल उमेदवार असा वाद उभा राहत आहे.
हेही वाचा - सातबारा कोरा होणार का?
महाविकास आघाडीबाबत आज चर्चा
शिवसेना, काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांमधील महाविकास आघाडीबाबत यापूर्वी दोन वेळा चर्चा झाली. त्यातून कोणताही निर्णयापर्यंत तिन्ही पक्षांना पोहोचता आले नाही. मात्र शनिवारी पुन्हा तिन्ही पक्षांची चर्चा होणार आहे. त्यानंतर पुढची भूमिका निश्चित होणार असल्याचे समजते. असे असले तरी शिवसेनेचा कल स्वतंत्र लढण्याकडे जास्त दिसून येत आहे.
महत्त्वाची बातमी - कोई भी मुजरीम मॉ की कोख से पैदा नही होता
काँग्रेस-राष्ट्रवादीचे ठरले
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीमध्ये जागा वाटपाचे निश्चित झाले आहे. त्यानुसार त्यांनी उमेदवारीबाबत पुढे पाऊलही टाकले आहे. मात्र शिवसेनेसोबतचा निर्णय अद्याप झाला नसल्याने शनिवारपर्यंत दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी प्रतीक्षा करण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांनी काँग्रेस आघाडीच्या जागा वाटपाबाबतचा निर्णय अंतिम असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.
जाणून घ्या - गुंगीचे बिस्कीट देऊन प्रवाशास लुटले
भाजपच्या उमेदवारीबाबत आमदारांकडून चाचपणी
जिल्हा परिषदेच्या ५३ जागांसाठी उमेदवार निश्चित करण्याच्या दृष्टीने भाजपच्या आमदारांनी चाचपणी सुरू केली आहे. शुक्रवारपासून आमदार रणधीर सावरकर यांनी उमेदवार निश्चित करण्याच्या दृष्टीने स्थानिक नेत्यांसोबत चर्चा सुरू केली आहे.
असे का घडले? - चाकूने अन् दगडाने ठेचून दोघांची हत्या
भाजप, वंचितमध्ये सर्वाधिक विस्थापित
सामाजिक व महिला आरक्षणामुळे भाजप व वंचित बहुजन आघाडीमधील अनेक स्थानिक नेते विस्थापित झाले आहेत. त्यांनी सोयीचा मतदारसंघ मिळत नसल्याने पर्यायी मतदारसंघाबाबत चाचपणी केली. मात्र तेथे त्यांना पार्सल उमेदवार म्हणून स्थानिक पातळीवर विरोध होताना दिसत आहे.