खासदार नाना पटोले यांचा खासदारकीचा राजीनामा

bjp mp nana patole
bjp mp nana patole

नवी दिल्लीः भारतीय जनता पक्षाचे खासदार नाना पटोले यांनी आज (शुक्रवार) खासदारकीचा राजीनामा लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांच्याकडे दिला आहे. पत्रकार परिषद घेऊन ते आपल्या पुढच्या प्रवासाबाबत माहिती देणार आहेत.

भंडारा-गोंदियाचे भाजप खासदार नाना पटोले यांनी गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीवर, केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांवर त्यांनी जाहीर टीका केली होती. शिवाय, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही लक्ष्य केले होते. शिवाय, राज्य सरकारने सप्टेंबरपर्यंत कर्जमाफीसंदर्भात ठोस पावले उचलावी अन्यथा आपण इतिहासाची पुनरावृत्ती करु शकतो, असे म्हणत नाना पटोले यांनी अप्रत्यक्षपणे राजीनाम्याचे संकेत दिले होते.

नाना पटोले यांनी 2008 मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. सन 2014 मध्ये त्यांनी प्रफुल्ल पटेल यांचा भंडारा मतदारसंघात पराभव केला होता. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी भाजपच्या धोरणांवर नाराजी दाखवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीवर सातत्याने उघडपणे टीका करत होते. शिवाय, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सातत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही लक्ष्य करत आहेत. माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी अकोल्यात शेतकऱ्यांसाठी केलेल्या आंदोलनात पटोले हे पूर्ण वेळ सहभागी झाले होते. राज्यात आणि देशात भाजपची सत्ता असूनही नाना पटोले यांनी थेट खासदारकीचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com