चंद्रपुरात नवीन "फॉरेन्सिक' लॅब

file photo
file photo

चंद्रपूर : राज्य शासनाने जीवशास्त्र व विषशास्त्र हे दोन विभाग समाविष्ट असलेल्या पाच नवीन लघु न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी महाराष्ट्रात सर्वप्रथम चंद्रपूर येथील लघु न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा सुरू करण्यात येणार आहे.
गुन्हेगारांच्या प्रवृत्तींना विफल करण्यासाठी तपास यंत्रणांना पुराव्यावर रासायनिक विश्‍लेषण करण्याच्या सामाजिक दृष्टिकोनातून तसेच न्यायालयाला महत्त्वाचा वैज्ञानिक पुरावा वेळेवर उपलब्ध करून देण्याच्या उद्देशातून प्रयोगशाळा सुरू करण्यात येत आहे. चंद्रपुरात शासनामार्फत लघु न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा विषशास्त्र विभाग व जीवशास्त्र विभाग हे दोन विभाग सुरू करण्यात येत आहेत. त्यापैकी विषशास्त्र विभागामध्ये शेतकरी आत्महत्या, विष प्राशन, दारू पिऊन मृत पावलेले अशी विविध प्रकरणे हाताळताना उलटी, पोटातील पाणी, रक्त यांचे रासायनिक विश्‍लेषण केले जाणार आहे.
तसेच जीवशास्त्र विभागामध्ये खून, बलात्कार, सर्पदंश अशा विविध प्रकरणांमध्ये रक्तगट, वीर्य परीक्षण, सर्पविष यासारखे विश्‍लेषण केले जाते. या प्रयोगशाळेत चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील प्रकरणे विश्‍लेषण केली जाणार असल्याची माहिती फॉरेन्सिक विभागाने दिली आहे. सध्या राज्यात मुंबई येथील न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय यांच्या आधिपत्याखाली 8 प्रादेशिक प्रयोगशाळा आहे. या प्रयोगशाळा मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद, नाशिक, अमरावती, नांदेड व कोल्हापूर येथे कार्यरत आहेत. अलीकडच्या काळामध्ये गुन्हेगारांमध्ये गुन्हे करताना अत्याधुनिक सामग्री विविध पद्धतीचा वापर होत असून, त्या प्रवृत्तींना आळा करण्यासाठी जप्त केलेल्या पुराव्यावर रासायनिक विश्‍लेषण करून सामाजिक हिताच्या दृष्टिकोनातून तपास यंत्रणांना तसेच न्यायालयाला महत्त्वावाचा वैज्ञानिक पुरावा वेळेवर उपलब्ध करून देण्याची महत्त्वाची भूमिका, या प्रयोगशाळा बजावणार आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com