सोन्याच्या किमतीचा नवा उच्चांक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 ऑगस्ट 2019

नागपूर ः सणासुदीच्या दिवसांना सुरुवात होण्यापूर्वीच सोन्या-चांदीच्या किमतीचा आलेख सतत आकाशाला गवसणी घालू लागला आहे. सोन्याच्या दराने शनिवारी आणखी एका उच्चांकाची नोंद केली. शहरातील सराफा बाजारात प्रतितोळा 50 रुपयांनी वधारलेल्या सोन्याच्या दराने 37,200 या आजवरच्या सर्वोच्च स्तरास स्पर्श केला. विशेष म्हणजे, चांदीच्या दरातही कमालीची वाढ होताना दिसत आहे. सराफा बाजारात चांदीच्या दरात प्रतिकिलो 200 रुपये वाढ झाली व हा दर 43,300 रुपयांवर पोहोचला.

अमेरिका व चीन या आर्थिक महासत्तांमधील व्यापारसंघर्ष दिवसेंदिवस चिघळत असल्याने जागतिक स्तरावरील गुंतवणूकदारांकडून सोन्यातील गुंतवणुकीस प्राधान्य दिले जात आहे. यामुळे सोन्याचे दर सातत्याने वाढत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दराने प्रति औंस 1500 अमेरिकी डॉलरची पातळी गाठली. या बाजारातही या दराने सहा वर्षांतील विक्रमी दर नोंदवला. दुसरीकडे, औद्योगिक वापरासाठीच्या मागणीत वाढ झाल्याने तसेच, नाण्यांचे उत्पादन करणाऱ्यांकडून वाढती मागणी असल्याने चांदीही उच्चांकी स्तरावर पोहोचली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The new high of gold prices