हुंड्यासाठी घेतला नवविवाहितेचा बळी

Dowry
Dowry

नागपूर - नवविवाहिता दीपाली आशीष आंबुलकर (२४, रा. जोशी ले-आउट, सुभाषनगर) हिने हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणात पोलिसांनी पती आशीष (३०), सासू प्रभा (५३) व सासरा रमेश (६०) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

मूळची चांदूरबाजार, अमरावतीच्या दीपालीचा फेब्रुवारी २०१८ मध्ये नागपुरातील आशीषशी विवाह झाला. आशीषचे आईवडील काही दिवसांपूर्वी मुलीकडे नाशिकला गेले होते. नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी आठ वाजता आशीष कामावर गेला. सकाळी १० वाजताच्या सुमारास त्याने दीपालीला फोन केला. मात्र, तिचा मोबाईल बंद होता. दीपालीचा फोन बंद असल्यामुळे आशीषने दुपारी एक वाजताच्या सुमारास शेजाऱ्याला फोन करून दीपालीबाबत विचारले. शेजाऱ्यांनी घराचे दार लावले असल्याचे सांगितले.

आशीष तत्काळ घरी आला व दार ठोठावले. परंतु, प्रतिसाद मिळाला नाही. त्याने घरामागील खोलीच्या खिडकीतून बघितले असता दीपाली बेडरूममध्ये गळफास घेतलेल्या स्थितीत होती. शेजारच्यांच्या मदतीने दार तोडून आशीष आत गेला व दीपालीला उतरविले. माहिती मिळताच प्रतापनगर पोलिस घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना केले. 

घरात कोणतीही सुसाइड नोट मिळाले नाही. पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला. तपासात दीपालीचे वडील विजय इंगळे यांनी पोलिसांना सांगितले की, लग्नापासूनच सासरच्यांकडून हुंड्यासाठी दीपालीचा छळ करण्यात येत होता. दररोजच तिला त्रास देण्यात येत होता. अत्याचाराला कंटाळूनच तिने गळफास लावला. पोलिसांनी विजयच्या तक्रारीवर आशीष, रमेश आणि प्रभा यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com