पोत्यात आढळले नवजात बाळ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जून 2019

देवरी (जि. गोंदिया) ः तालुक्‍यातील डवकी येथील गजानन मंदिरालगत सिमेंटच्या प्लास्टिक पोत्यात गुंडाळलेल्या अवस्थेत नवजात बाळ आढळून आले. ही घटना रविवारी (ता.23) सकाळी सहाच्या सुमारास उजेडात आली. उपचाराकरिता नवजात बाळ देवरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तालुक्‍यातील डवकी परिसरातील गजानन मंदिराजवळ प्रकाश फरदे हे वास्तव्यास आहेत. रविवारी सकाळी 6 वाजेच्या सुमारास त्यांना घरामागे नवजात बाळाचे रडणे ऐकू आले. त्यांनी घरामागे जाऊन पाहिले. त्यांना सिमेंटच्या प्लास्टिक पोत्यात गुंडाळलेल्या अवस्थेत बाळ रडताना दिसून आले. घटनेची माहिती गावात पसरली. घटनास्थळी अलोट गर्दी झाली. येथील सरपंच उत्तमराव बावनकर व पोलिस पाटील अनिल वंजारी यांनी घटनास्थळी पोहोचून विचारपूस केली. त्यांना योग्य माहिती मिळाली नाही. घटनेची माहिती देवरी पोलिसांना देण्यात आली. दरम्यान, बाळाला उपचाराकरिता देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. बेवारस आढळून आलेला बाळ अनैतिक संबंधातून जन्मलेला असून, बदनामीच्या भीतीमुळे अज्ञात लोकांनी विल्हेवाट लावली, अशी चर्चा डवकी गावात सुरू होती.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Newborn baby found in a sack