नॅकच्या रिपोर्टची "सेल्फ स्टडी' होईना 

file photo
file photo

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला नॅक मूल्यांकनाला सामोरे जायचे आहे. त्यापूर्वी विद्यापीठाला "सेल्फ स्टडी रिपोर्ट' (एसएसआर) तयार करावा लागतो. मात्र, विद्यापीठ या रिपोर्टबद्दल गंभीर नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, "एसएसआर' अद्याप तयार नसल्याची माहिती आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे विद्यापीठातील विविध विभागांनी काही दिवसांपूर्वी "आयक्‍यूएसी सेल'ला पाठविलेल्या अहवालात अनेक त्रुटी आहेत. त्या दूर करण्यासाठी परत विभागांकडे अहवाल पाठविण्यात येत असल्याने नॅकच्या मूल्यांकनात मोठा फटका बसण्याची शक्‍यता आहे. 


इंटर्नल क्‍वालिटी एश्‍शुरन्स सेलद्वारे (आयक्‍यूएसी) विद्यापीठाच्या सर्व शैक्षणिक विभागांकडून प्रत्येक तीन महिन्यांत अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या जातात. यात एकूण विद्यार्थी, दिव्यांग विद्यार्थी, शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी, हजेरी, कार्यक्रम, परिषदा व विविध माहिती सादर करावी लागते. अनेक विभागांनी सादर केलेल्या माहितीत बऱ्याच त्रुटी दिसल्या. पहिल्या तीन महिन्यांच्या अहवालातील विद्यार्थिसंख्या व पुढील तीन महिन्यांच्या विद्यार्थिसंख्येत तफावत असल्याचे निदर्शनास आले. या त्रुटीमुळे अनेक विभागांचे अहवाल पुन:पुन्हा परत पाठविले जात आहे. त्यामुळे नॅकसाठी अहवाल तयार करताना "आयक्‍यूएसी'ची दमछाक होत आहे. विशेष म्हणजे, नॅक मूल्यांकनासाठी "आयक्‍यूएसी'ला वेळेत पाठवावा लागतो. मात्र, एका महिन्यावर नॅक मूल्यांकनाची वेळ आली असताना, अहवालाची माहिती परिपूर्ण करण्यासाठी विद्यापीठ "आयक्‍यूएसी सेल'चे विशेष सॉफ्टवेअर तयार करीत आहे. 
दुसरीकडे एसएसआर रिपोर्टला विलंब होत असल्याने नॅकने विद्यापीठाला संपूर्ण माहिती पुराव्यानिशी मागितली जाते. त्यात कोणी परिषदेची माहिती दिल्यास त्यास "जीओ टॅगिंग'सोबत त्याचा फोटा सादर करावा लागतो. शिवाय, विद्यार्थ्यांच्या "प्लेसमेंट'चा अहवाल सादर करावा लागतो. परिणामी, एवढी विस्तृत माहिती सादर करावी लागत असल्याने विभागप्रमुख चिंतित आहेत. त्यामुळेच अनेक विभागप्रमुखांनी आयक्‍यूएसी सेलसोबत असहकार्याचे धोरण अवलंबिल्याचे चित्र आहे. यामुळे "एसएसआर' तयार करण्यास विलंब होत आहे. मात्र, काही अपरिहार्य कारणातून विलंब झाला असला, तरी अहवालाचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे "आयक्‍यूएसी'चे संचालक डॉ. एस. झाडे यांनी सांगितले. तसेच एसएसआरचा रिपोर्ट वेळेत तयार होईल, असा दावाही केला आहे.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com