esakal | महापालिका शिक्षकांचा पुढचा पगार सातव्या आयोगानुसार
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहित छायाचित्र

महापालिका शिक्षकांचा पुढचा पगार सातव्या आयोगानुसार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर ः महापालिकेच्या शिक्षकांना सप्टेंबर महिन्यापासून सातव्या वेतन आयोगानुसार वेतन देण्यात येईल, असे आश्‍वासन सत्तापक्षनेते संदीप जोशी यांनी दिले. त्यामुळे पुढील महिन्यात शिक्षकांच्या हातात भरघोस वेतन येणार आहे.
अप्पर आयुक्त राम जोशी यांच्या कक्षात मनपा शिक्षक संघाच्या शिष्टमंडळासोबत चर्चा झाली. यात अंतिम यादी लवकर प्रकाशित करून मुख्याध्यापकाचे प्रमोशन त्वरित करण्याचे आश्वासन देण्यात आले. शिक्षकदिनाचे औचित्य साधून माध्यमिक व प्राथमिक शिक्षकांचे निवडश्रेणी प्रस्ताव डीपीसीमध्ये ठेवून तत्काळ निकाली काढण्याबाबत निर्णय झाला. शिक्षकांच्या कामाच्या वेळेबाबत 11 ते 5 यावेळेत शिक्षकांचा कार्य राहील, असे स्पष्ट करण्यात आले. माध्यमिक अनुदानित शाळेतील सातव्या वेतन आयोगाचे 59 महिन्यांचे बिल जिल्हा परिषद यांना तत्काळ सादर करण्याचा निर्णय झाला. सर्वांत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे चालू महिन्याचे वेतन सातव्या वेतन आयोगाप्रमाणे देण्यात येईल, असे सत्तापक्षनेते संदीप जोशी यांनी स्पष्ट केले.
पाच सप्टेंबर शिक्षकदिनाचा कार्यक्रम परंपरेनुसार जुन्याच पद्धतीने येत्या 12 तारखेच्या अगोदर घेण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. माध्यमिक अनुदानित शाळेतील सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांचे निवृत्तिवेतन थेट शासनाच्या तिजोरीतून त्यांच्या खात्यात देण्यात यावे, याकरिता विभागाकडे त्वरित प्रस्ताव पाठविण्यास संदर्भात निर्णय झाला. शासनाच्या धोरणानुसार यावर्षी कोणत्या शाळा बंद करण्यात आलेल्या नसून कोणचेही समायोजन करण्यात आले नाही असे विभागाकडून सांगण्यात आले. संगणक परीक्षा उत्तीर्ण झालेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांचे ज्या वेतनवाढ थांबवण्यात आल्या त्या शासनाच्या निर्देशाप्रमाणे निर्णय घेऊन त्यांना न्याय देण्यात येईल, असे आश्वस्त करण्यात आले. शिष्टमंडळाचे नेतृत्व संघाचे अध्यक्ष राजेश गवरे यांनी केले. शिष्टमंडळांमध्ये प्रमुख सचिव देवराव मांडवकर, कोषाध्यक्ष मलविंदरकौर लांबा तसेच उपाध्यक्ष राकेश दुम्पलवार, आनंद नागदिवे, तेंजूषा नाखले, सचिव दीपक सातपुते, अशोक बालपांडे, समस्त शिक्षक व पदाधिकारी उपस्थित होते.

loading image
go to top