रात्रशाळेतील शिक्षक होणार ‘फूलटाइम’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 मे 2017

नागपूर - रात्रशाळेतील शिक्षक आणि त्यांच्या सेवाशर्ती तसेच या शाळांमध्ये पुरविण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुविधांसंदर्भात प्रलंबित राहिलेला प्रश्‍न शालेय शिक्षण विभागाने मार्गी लावला. शहरातील रात्रशाळेत काम करणाऱ्या शिक्षकांना यापुढे पूर्ण वेळ शिक्षक समजून त्यांना पूर्ण वेतन मिळेल. यापुढे त्यांना इतर कोणत्याही शाळेत शिकविता येईल. या निर्णयामुळे  शहरातील सत्तरहून अधिक शिक्षकांना याचा फायदा होईल. 

शहरातील सध्या ९ रात्रशाळा तर २ ज्युनिअर कॉलेज सुरू आहेत. शाळाबाह्य मुलांना शिक्षणाचा अधिकार मिळावा, तसेच या अधिकारापासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी रात्रशाळेत या मुलांना सामावून घेण्यासाठी खास तरतूद करण्यात आली. वयाच्या अकराव्या वर्षापासून या  शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार असला तरी प्रवेशासाठी कमाल वयोमर्यादेची कोणतीही अट लागू राहणार नाही, याचीही खास तरतूद या निर्णयातून केली आहे. राज्यात आत्तापर्यंत रात्रशाळांना अनेक अधिकारांपासून वंचित ठेवण्यात आले होते, मात्र या निर्णयामुळे या शाळा आता पूर्णवेळ शाळा म्हणून गणल्या जातील. प्रत्येक विद्यार्थ्याची आणि शिक्षकांचीही बायोमेट्रिक हजेरी केली जाणार असून अनुदानित, सरकारी शाळांतील शिक्षकांना देण्यात येणारे सर्व प्रकारचे लाभ या शाळेतील शिक्षकांना मिळणार आहेत. यात वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती, शालेय वेतन प्रणाली, शासनाच्या प्रचलित धोरणानुसार अनुकंपा तत्त्वाने भरती धोरणही लागू राहणार आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षेत या रात्रशाळांमधून अनेक गुणवंत विद्यार्थी निघत असल्याचे अनेकदा  निदर्शनास आले आहे. त्यामुळे रात्रशाळांचे महत्त्व शहराच्या दृष्टीने अधिकच महत्त्वाचे आहे. या निर्णयाने शहरातील रात्रशाळांमध्ये काम करणाऱ्या सत्तरहून अधिक कर्मचाऱ्यांचा याचा लाभ होणार हे विशेष.

Web Title: Night school teachers