चंद्रहास्य, निकिता ठरले वेगवान धावपटू

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नागपूर: विद्याभारती नागपूर महानगरतर्फे आयोजित उषाताई अरविंद टेंमुर्णीकर स्मृती चषक विदर्भ प्रांत ऍथलेटिक्‍स स्पर्धेत चंद्रहास्य दातारकर व निकिता सराटेने 19 वर्षे वयोगटात, ओजस चहांदे व सानिका मगरने 17 वर्षे वयोगटात, तर ओम इटकेलवार व सान्वी पाठकने 14 वर्षांखालील गटातील 100मीटरमध्ये अव्वल स्थान पटकावून वेगवान धावपटूंचा बहुमान पटकाविला.

मानकापूर येथील विभागीय क्रीडासंकुलातील सिंथेटिक ट्रॅकवर सुरू असलेल्या या स्पर्धेत भोसला मिलिटरी स्कूलच्या चंद्रहास्यने 100 मीटर अंतर 13.36 सेकंदात पूर्ण केले. तर उत्कर्ष विद्या मंदिरच्या निकिताने 14.74 सेकंद इतकी वेळ नोंदविली. 17 वर्षे वयोगटातील विजेता निराला कनिष्ठ महाविद्यालयाच्या ओजसने 11.09 सेकंद आणि बीकेसीबीच्या सानिकाने 13.71 सेकंद वेळेची नोंद केली. 14 वर्षे वयोगटात पं. बच्छराज व्यास विद्यालयाच्या ओमने 12.38 सेकंद आणि मॉडर्न स्कूलच्या सान्वीने 12.94 सेकंदात 100 मीटर अंतर पूर्ण केले.
स्पर्धेचे उद्‌घाटन तेजस विद्यालयाचे संचालक अरविंद टेंमुर्णीकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी माजी आंतरराष्ट्रीय धावपटू मनोज बालपांडे, पीयूष आंबुलकर, विद्याभारती विदर्भ प्रांत अध्यक्ष रमेश धारकर, विभागीय शिक्षण मंडळाच्या सदस्य मृणालिनी दस्तुरे, जितेंद्र घोरदडेकर, पद्‌माकर चारमोडे, सचिन देशमुख, विशाल लोखंडे, सुमेर कावळे, प्रिया भोरे, सोनाली पाथ्रडकर उपस्थित होते.

अन्य निकाल (प्रथम तीन विजेते) : 14 वर्षे वयोगट : 400 मीटर दौड (मुले) : मंथन शेंडे (बच्छराज विद्यालय), राघव ठाकरे (आर.एस. मुंडले स्कूल), युवराज चौधरी (हडस हायस्कूल). (मुली) : भव्यश्री महल्ले (जे. पी. इंग्लिश स्कूल), आकांक्षा सौडिया (भगवती गर्ल्स स्कूल), जान्हवी हिरुडकर (बच्छराज विद्यालय). गोळाफेक (मुले) : प्रशांत राणा (सरस्वती विद्यालय), दुर्वेश गांधी (स्कूल ऑफ स्कॉलर्स), आवेझ शेख (भवन्स विद्यामंदिर). (मुली) : तृप्ती मानवटकर (पालीवाल विद्यालय), सनया सैयद (सीबीएसव्ही, भुसावळ), प्रशिता तिवारी (ई-पाठशाला, विहीरगाव).
17 वर्षांखालील : 400 मीटर दौड (मुले) : आयूष जैस (भोसला स्कूल), हर्षल छत्री (बच्छराज विद्यालय), श्रेयस गौड (बीआरए मुंडले स्कूल). (मुली) : धनश्री कामठे (न्यू इंग्लिश हायस्कूल), देविका कोलते (बच्छराज विद्यालय), साई भिसीकर (मुंडले स्कूल). 3000 मीटर दौड (मुले) : सुजल कुथे (बच्छराज विद्यालय), सुधन्व ढेंगे (नवयुग विद्यालय), भूपेश चोरे (भोसला स्कूल). (मुली) : जयश्री बोरेकर (भगवती गर्ल्स), मिताली भोयर (बच्छराज विद्यालय), तृप्ती पटले (नेहरू हायस्कूल). गोळाफेक (मुले) : योगेश बांते (इंदूताई हायस्कूल), गौरव चिटकुले, आयुष कांबळे (दोघेही बीआरए मुंडले स्कूल), (मुली) : रिषिका भोरे, तन्वी सुंदरकर (दोघीही भवन्स त्रिमूर्तीनगर),
19 वर्षांखालील : 400 मीटर दौड (मुले) : तक्षक चौरे (बच्छराज विद्यालय), तन्मय पासलकर (नारायणा विद्यालय), प्रतिक बारापात्रे (न्यू इंग्लिश हायस्कूल). (मुली) : अवंती हटवार, भुवनेश्‍वरी मसराम (दोघीही बच्छराज विद्यालय), प्रतीक्षा बारापात्रे (भगवती गर्ल्स स्कूल). 3000 मीटर दौड (मुले): निक्की बारापात्रे (न्यू इंग्लिश हायस्कूल), प्रज्वल माने (विश्‍वनाथ बाबा हायस्कूल). (मुली) : मोहिनी भुते (बच्छराज विद्यालय), दामिनी लांजेवार (विश्‍वनाथ हायस्कूल), निधी तरारे (मूकबधिर विद्यालय). गोळाफेक (मुले) : अर्हत नगराळे (भोसला स्कूल), कुणाल भुगमारे (एलबीएसव्ही), अर्नित खालसा (भोसला स्कूल).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com