#FridayMotivation रामटेकची निकिता करणार मोदींचे सारथ्य

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

निकिता महाजन हिची निवड नागपूर मेट्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मेट्रो सफरीसाठी केली आहे. रामटेकच्या छोरिया ले आउटमधील रहिवासी असलेल्या दुर्गेश महाजन यांची निकिता ज्येष्ठ कन्या. तिला दोन बहिणी व एक भाऊ आहे. रामटेकच्या समर्थ कॉन्व्हेंटमध्ये सातवीपर्यंत शिक्षण घेतले.

रामटेक - येथील 26 वर्षीय रामटेकची कन्या निकिता दुर्गेश महाजन (वय26) ही शनिवारी (ता.7) देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सारथ्य करणार आहे. पंतप्रधान मोदी हे नागपुरात आल्यानंतर नागपूर मेट्रोमधून फेरी मारणार आहेत. ही सफर घडविणार आहे निकिता.

निकिता महाजन हिची निवड नागपूर मेट्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मेट्रो सफरीसाठी केली आहे. रामटेकच्या छोरिया ले आउटमधील रहिवासी असलेल्या दुर्गेश महाजन यांची निकिता ज्येष्ठ कन्या. तिला दोन बहिणी व एक भाऊ आहे. रामटेकच्या समर्थ कॉन्व्हेंटमध्ये सातवीपर्यंत शिक्षण घेतले. माध्यमिक शिक्षण नामांकित समर्थ हायस्कूलमध्ये घेतले. अत्यंत हुशार असलेल्या निकिताचे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण नागपूरच्या भिडे गर्ल्स कनिष्ठ महाविद्यालयात झाले. त्यानंतर रामटेक येथील प्रसिद्ध कवी कुलगुरू अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्‍ट्रिकल्स शाखेतून तिने अभियांत्रिकीची पदवी संपादन केली. 16 जानेवारी 2019 रोजी नागपूर मेट्रोमध्ये निकिता रुजू झाली. खडतर प्रशिक्षण पार पडले. आतापर्यंत मेट्रोच्या अनेक फेऱ्या निकिताला मोठा अनुभव देऊन गेल्यात. 7 सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते नागपूर मेट्रोचे लोकार्पण होत आहे. यावेळी पंतप्रधान मोदी सुभाषनगर ते सीताबर्डी असा प्रवास मेट्रोतून करणार आहेत. त्या मेट्रोचे सारथ्य निकिता करणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nikita to drive Nagpur Metro for pm Narendra Modi