निंबाळकरांना दोन दिवसांची पोलिस कोठडी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 मे 2018

नागपूर - पन्नास हजाराच्या लाच प्रकरणात लाचलुपचत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) अटक केलेले जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (डेप्युटी सीईओ) अरुण निंबाळकर यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी पाठविले आहे. निंबाळकरांवर निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आहे. 

नागपूर - पन्नास हजाराच्या लाच प्रकरणात लाचलुपचत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) अटक केलेले जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (डेप्युटी सीईओ) अरुण निंबाळकर यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी पाठविले आहे. निंबाळकरांवर निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आहे. 

ग्रामपंचायत चिचाळा (ता. भिवापूर) येथे असलेल्या ग्रामसेविकेकडून निंबाळकर यांनी लाच स्वीकारली होती. तक्रारकर्ती यांच्याकडे ऑगस्ट 2016 ते जून 2017 पर्यंत गट ग्रामपंचायत नांद येथील अतिरिक्त कार्यभार सोपविले होते. चौदावे वित्त आयोगाअंतर्गत साहित्य खरेदी व बांधकामाच्या कामामध्ये गट ग्रामपंचायत नांद येथे झालेल्या भ्रष्टाचारबाबत तक्रारदार ग्रामसेविकेची चौकशी सुरू होती. 

भिवापूर पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांनी चौकशी अहवाल अरुण निंबाळकर यांना सादर केला. प्रकरण बंद करण्यासाठी निंबाळकर यांनी एक लाखाची मागणी केली. पहिला हप्ता 50 रुपये देण्याची मागणी केली. ही रक्कम स्वीकारताना एसीबीच्या पथकाने त्यांना शुक्रवारी रंगेहात पकडले. त्यांना शनिवारी न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. 

एसीबीकडून त्यांच्या घराचीही झडती घेण्यात आली. मात्र, या संदर्भातील तपशील मिळू शकला नाही. 

अंतर्गत चौकशी 
निंबाळकरांच्या जाचाला कंटाळून ग्रामसेवकांनी वर्षभरापूर्वी कामबंद आंदोलन पुकारले होते. ग्रामसेवकांनी त्यांच्यावर आर्थिक पिळवणूक करण्याची तक्रार सीईओंकडे केल्याची माहिती आहे. सीईओंनी चौकशीअंतर्गत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली होती. यात प्रशासकीय अनियमिता काहीच मिळाली नसून आर्थिक बाबीवर तपास करण्यात आला नसल्याचा अहवाल विभागीय आयुक्त आणि शासनास सादर केल्याची माहिती आहे. 

Web Title: Nimbalkar police custody for two days