किती हे दुर्भाग्य! पैसे काढले अन्‌ चोरी गेले

file photo
file photo

नागपूर : चोरांनी बॅंकेसमोर असलेल्या कारची काच फोडून नऊ लाखांची बॅग चोरून नेल्याची घटना शिवाजीनगर येथील एचडीएफसी बॅंकेत घडली. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीष तरसेमकुमार बंसल (42, रा. सेमिनरी हिल्स) यांचे रितेश जैन यांच्यासोबत भागीदारीत कार्टन बॉक्‍स तयार करण्याचा कारखाना आहे. दोघांचेही शिवाजीनगर येथील एचडीएफसी बॅंकेत संयुक्त खाते आहे. बुधवारी दुपारी मनीष बंसल यांनी बॅंकेतून नऊ लाख काढले. पैसे बॅगमध्ये भरून कारच्या डाव्या बाजूच्या सीटखाली ठेवले. यानंतर ते जवळच असलेल्या लोट्‌स इलेक्‍ट्रॉनिक्‍स दुकानात गेले. बॅंकेच्या महिला कर्मचाऱ्याने रितेश जैन यांना फोन करून बंसल यांची सही जुळत नसल्याचे सांगून त्यांना बॅंकेत परत पाठवा असे सांगितले. रितेश जैन यांनी बंसल यांना फोन करून परत बॅंकेत जाण्यास सांगितले. दुपारी 3.40च्या सुमारास बंसल पुन्हा बॅंकेत गेले. ही संधी साधून चोरांनी कारची काच फोडून पैशाची बॅग चोरून नेली. सही करून बंसल कारजवळ आले असता पैशाची बॅग दिसली नाही. अंबाझरी पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. 
सीसीटीव्ही फुटेज ताब्यात 
बॅंकेसमोरील कारमधून बॅग लंपास करतानाचे सीसीटीव्ही फुटेज बॅंकेच्या आणि रस्त्यावरील काही दुकानांमधील सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. पोलिसांनी काही ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत. त्यावरून आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com