नव्या नऊ बॅक्‍टेरियांचा शोध

प्रवीण खेते
रविवार, 29 एप्रिल 2018

अकोला - शिवाजी महाविद्यालयात जीवशास्त्र विभागाअंतर्गत पीएचडीची विद्यार्थिनी प्रा. मोनिका रोकडे यांनी नऊ नवीन जिवाणूंचा (बॅक्‍टेरिया) शोध लावल्याचे ‘नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्‍नॉलॉजी इन्फर्मेशन’ने (एनसीबीआय) स्पष्ट केले आहे. त्याची दखल ‘वर्ल्ड जीन बॅंके’ने घेतली असून, या त्यांच्या संशोधनामुळे अकोल्याचे नाव पुन्हा जगाच्या पाठीवर उमटले आहे. 

अकोला - शिवाजी महाविद्यालयात जीवशास्त्र विभागाअंतर्गत पीएचडीची विद्यार्थिनी प्रा. मोनिका रोकडे यांनी नऊ नवीन जिवाणूंचा (बॅक्‍टेरिया) शोध लावल्याचे ‘नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्‍नॉलॉजी इन्फर्मेशन’ने (एनसीबीआय) स्पष्ट केले आहे. त्याची दखल ‘वर्ल्ड जीन बॅंके’ने घेतली असून, या त्यांच्या संशोधनामुळे अकोल्याचे नाव पुन्हा जगाच्या पाठीवर उमटले आहे. 

शिवाजी महाविद्यालयात तासिका तत्त्वावर कार्यरत प्रा. मोनिका रोकडे यांनी जुलै २०१४ मध्ये शिवाजी महाविद्यालयातच पीएचडीला प्रवेश घेतला. यासाठी त्यांनी ‘स्टडी ऑन बायोडायव्हर्सिटी ऑफ क्रोमोबॅक्‍टेरिया अँड देअर बायोॲक्‍टिव्ह फ्रेगमेंट्‌स’ या विषयाची निवड केली. यासाठी त्यांना मार्गदर्शक म्हणून जीवशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख डॉ. अर्चना पेठे होत्या. त्यांनी रंगीत बॅक्‍टेरियांच्या प्रजातींच्या अभ्यासाला सुरवात केली. चार वर्षांच्या अभ्यासामध्ये त्यांनी जिवाणूंच्या जीन लेव्हलवरही अभ्यास केला. अभ्यासात आढळलेल्या नवीन जिवाणूंची माहिती त्यांनी ‘एनसीबीआय’कडे सादर. 

या बॅक्‍टेरियांचा लावला शोध
    सुडोमोनास ऐरोजुनोसा
    सिनेटो बॅक्‍टर इंडिकस
    सिरासिया मार्सिसेंस
    कोकुरिया टर्फेंसिस
    कोकुरीया रोझिया
    कोकुरीया डेक्‍यांजेंसिस
    क्रोमोबॅक्‍टेरियम व्हायलेसियम
    सुडोमोनाज स्टुझेरी
    अक्रोमोबॅक्‍टेरिया इंसोलिटस

बॅक्‍टेरियाचे उपयोग
सौंदर्य प्रसाधने, क्रीम, लिपस्टिक, बॉडी लोशन आदी सौंदर्य प्रसाधनांमध्ये; तसेच वस्त्रांच्या रंगरंगोटीसाठी आणि सन गॉगल्सवर विविध रंगांच्या आच्छादनासाठीही जिवाणूंचा उपयोग होतो.

पीएचडीचा अहवाल ‘एनसीबीआय’कडे हस्तांतरित केल्यावर नऊ जिवाणूंचा प्रथमच शोध लागल्याचे सांगितले. रंगरूपी असलेल्या या जिवाणूंच्या सौंदर्य प्रसाधने आणि औषधांमध्ये उपयोग होणार आहे. यासाठी डॉ. अर्चना पेठे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
- प्रा. मोनिका रोकडे, संशोधक

औषधनिर्मिती 
हे जिवाणू कर्करोग, कोड या आजारांवर ‘बायो नॅनो मेडिसिन’ म्हणून प्रभावी औषध ठरणार आहेत. ‘क्रोडीओसिन’ या रंगद्रव्यापासून कर्करोगावर औषधनिर्मिती शक्‍य आहे. हे रंग द्रव्य ‘सिरासिया मारसेंसेस’ या बॅक्‍टेरियामध्ये मुबलक प्रमाणात आढळते.

Web Title: nine new bacteria research