video : बापरे! नागपूर-औरंगाबाद मार्गावर लुटली नऊ प्रवाशी वाहने

Nine passenger vehicles looted on Nagpur-Aurangabad route
Nine passenger vehicles looted on Nagpur-Aurangabad route

देऊळगाव राजा (जि.बुलडाणा) : राष्ट्रीय महामार्गावर खराब रस्ता आणि चढ असल्याने वेग कमी झालेल्या लक्झरी बसच्या डिककीतून प्रवाशांच्या बॅग लुटणाऱ्या चार दरोडेखोरांना देऊळगाव मही नजीक पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने अटक केल्याची घटना शुक्रवारी (ता.७) पहाटे घडली दरम्यान आरोपींकडून वीस लाखांच्या ट्रकसह प्रवाशांच्या बॅग जप्त करण्यात आल्या असून दुसऱ्या ट्रकसह तिघे दरोडेखोर फरार झाले.

दोन ट्रक नागपूर येथून उस्मानाबादकडे जाण्यासाठी गुरुवारी सायंकाळी निघाले परतीच्या प्रवासात  खामगाव चिखली  मार्गावर दोन लक्झरी बसच्या डिक्कीतून प्रवाशांच्या बॅग चोरल्या पुढे देऊळगाव महीच्या समोर असलेल्या खडकपूर्णा पुलाच्या आईकडे ट्रक उभा करून अकोल्याच्या दिशेने जाणाऱ्या राजलक्ष्मी ट्रॅव्हल्सचा वेग कमी झाल्याचा फायदा घेऊन चोरट्याने डिक्की उघडून प्रवाशांच्या बॅग रस्त्यावर टाकताना लक्झरी चालकाच्या लक्षात आले त्याने प्रसंगावधान राखून देऊळगावमही चौकी गाठली आणि पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला पोलीस चौकीत कर्तव्यावर असलेले एएसआय अशोक बुधवत यांनी ठाणेदार संभाजी पाटील यांना लक्झरी बस लुटल्या बाबत ची माहिती सांगितली आणि आपले सहकारी अखिल काजी यांच्यासह एएसआय बुधवत घटनास्थळी पोहोचले.

दरम्यान देऊळगाव राजा पोलिस स्टेशनचे कर्मचारी सुद्धा तेथे पोहोचले व त्यांनी देऊळगाव मही व टाकरखेड भागीले येथील नागरिक कृष्णा शिंगणे शेख अन्सार भरत देशमुख बाळासाहेब देशमुख भरत शिंगणे यांच्या मदतीने आरोपींचा शोध घेतला असता एका शेतात बॅगमधून मौल्यवान वस्तू काढताना दरोडेखोर दिसले पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने चार जणांना पकडले तर एक ट्रक घेऊन तिघे दरोडेखोर पळून गेले पोलिसांनी दरोडेखोर यांच्या सह त्यांच्या ताब्यातील ट्रक प्रवाशांच्या व सहा बॅग जप्त केल्या लक्झरी चालक योगेश नाना पाटील राहणार कोंडामळी तालुका जिल्हा नंदूरबार यांच्या फिर्यादीवरून सतीश अर्जुन काळे वय 24 राहणार खांबकरवडी, धनाजी सुरेश शिंदे वय 18 राहणार येरमाळा तालुका वाशी,विकास कचरू चंदनशिवे 28 राहणार शेलगाव कळम, संजय रामा काळे २३ राहणार तेरखेडा तालुका वाशी जिल्हा उस्मानाबाद यांच्याविरुद्ध दरोड्याच्या गुन्हा नोंदविला त्यांच्याकडून ट्रक क्रमांक एम एच १२ के.पी ५८७१ वाहन जप्त केला सदर प्रकरणात विकास संतोष शिंदे राहुल रामा काकडे व सचिन शिवाजी शिंदे तिन्ही दरोडेखोर ट्रक क्रमांक एम.एच ४६ -१७६१ घेऊन फरार झाले पोलिसांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लक्झरी बसेस लुटणाऱ्या सराईत दरोडेखोरांना नागरिकांच्या मदतीने पकडून त्यांच्याविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करून अटक केली सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ उपविभागीय पोलिस अधिकारी बी.एन नलावडे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार संभाजी पाटील,एएसआय अशोक बुधवत,अखिल काजी, हेडकॉन्स्टेबल केशव मुळे,नितीन राजेजाधव विजय, शिवानंद केदार,श्री गुंजकर यांनी सदर कारवाईत सहभाग घेतला दरम्यान पोलीस तपासात आणखी तीस ते पस्तीस प्रवाशांच्या बॅग सापडण्याची शक्यता आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com