यवतमाळ - साक्षगंध आटोपून येताना भीषण अपघात; नऊ ठार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 डिसेंबर 2018

यवतमाळ - यवतमाळ येथून साक्षगंधाचा क्रम आटोपून परत जाणाऱ्या कु्रझरला ट्रकने धडक दिल्याने नऊ जण जागीच ठार झाले असून, सहा जण जखमी झाले. 

यवतमाळ-नागपूर मार्गावरील चापर्डा येथे आज सोमवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. 

तानबा पुंडलीक स्थुल (वय ५५), चालक सचिन बाबाराव पिसे (वय २२), सुशिला रमेश स्थुल (वय४५) रा. सर्व पार्डी सुकळी असे मृतकांची नावे आहेत. नितीन स्थुल रा. पार्डी सुकळी, अमोल नवघरे रा. नागझरी यांच्यासह एकुण सहा जण जखमी झाले. 

कळंब तालुक्यातील पार्डी सुकळी येथील नितीन स्थुल यांचे यवतमाळ येथील वाघापूर येथील कांबळे यांच्याकडे साक्षगंध होता. सदर कार्यक्रम आटोपून आज सोमवारी रात्री आपल्या गावाकडे एम.एच. २९ आर ७१५९ क्रमांकाच्या क्रुझरने परत जात होते. नागपूरकडून यवतमाळकडे जाणाऱ्या एम.एच. ४०-३२८८ क्रमांकाच्या ट्रकने सदर क्रुझरला धडक दिली. ही धडक एवढी जबरदस्त होती की, कु्रझरमधील नउ जण जागीच ठार झाले असून, सहा जण जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच कळंबचे ठाणेदार नरेश रणधीर, वाहतूक पोलीस व अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. पंचनामा करून मृतदेह कळंब येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले. जखमींना कळंब ग्रामिण रुग्णालय व यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात  उपचारार्थ दाखल केले.

Web Title: Nine People Death in Accident