नऊ वर्षीय मुलीवर अल्पवयीन मुलाचा अत्याचा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जुलै 2019

जलालखेडा (जि. नागपूर) ः एका नऊ वर्षीय मुलीवर अल्पवयीन मुलाने अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार नरखेड तालुक्‍यातील देवग्राम येथे उघडकीस आला.

जलालखेडा (जि. नागपूर) ः एका नऊ वर्षीय मुलीवर अल्पवयीन मुलाने अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार नरखेड तालुक्‍यातील देवग्राम येथे उघडकीस आला.
सविस्तर वृत्त असे की सोळा वर्षीय मुलाने त्याच्या घराशेजारी राहणारी व चौथ्या वर्गात शिकणारी मुलगी शनिवारी (ता.13) सायंकाळी घरी एकटीच असल्याचे पाहून तिच्या घरात शिरला. यावेळी मुलगी भांडे घासत होती. आरोपी मुलाने मुलीवर बळजबरीने अत्याचार केला. या घटनेची वाच्यता होऊ नये म्हणून गावातील अनेक मान्यवरांनी प्रकरण गावातच मिटविण्याचा प्रयत्न केला. पण, मुलीच्या नातेवाइकाने मुलीला शनिवारी(ता.13) रात्री जलालखेडा येथे पोलिस ठाण्यात येऊन तक्रार दाखल केली. मुलीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला. आरोपी अल्पवयीन असून अटक न करता त्याला ताब्यात घेतले. मुलीची प्राथमिक वैद्यकीय तपासणी जलालखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आली व यानंतर मुलीला पुढील उच्चस्तरीय वैद्यकीय तपासणीसाठी नागपूर येथे रवाना करण्यात आले. मुलाचीदेखील वैद्यकीय तपासणी करून त्याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या घटनेची माहिती पसरताच अनेकांनी या घटनेविरोधात संताप व्यक्त करीत कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nine-year-old girl's minor child