निर्मला सीतारामन यांची संघ मुख्यालयाला भेट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 मे 2018

नागपूर - केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अचानकपणे रा. स्व. संघाच्या मुख्यालयाला भेट देऊन संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांची भेट घेतली. या भेटीमागचा उद्देश कळू शकला नाही. पाकिस्तान व चीनच्या सीमेवरून भारताच्या सीमेवर सातत्याने हल्ले होत असताना संरक्षणमंत्र्यांनी अचानकपणे नागपूर गाठल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

निर्मला सीतारामन यांचा कोणताही शासकीय कार्यक्रम नागपुरात नव्हता. त्या थेट रेशीमबागेतील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिरात गेल्या. तेथे त्यांनी संघाचे प्रथम सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या समाधीचे दर्शन घेतले. या वेळी त्यांच्यासोबत भय्याजी जोशी उपस्थित होते. त्यानंतर सीतारामन यांनी भय्याजी जोशी यांच्याशी बंदद्वाराआड चर्चा केली. काही दिवसांपासून पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. या गोळीबारात भारतीय सीमेवरील नागरिक व भारतीय जवान बळी पडत आहेत.

Web Title: nirmala sitaraman visit to RSS Headquarters