निशांत अग्रवालचा जामीन फेटाळला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

नागपूर ः पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या निशांत अग्रवालचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. निशांत ब्रह्मोस एरोस्पेसच्या नागपूर शाखेत अभियंता होता. येथील गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा त्याच्यावर आरोप आहे. त्याला उत्तर प्रदेश एटीएसने 8 ऑक्‍टोबर 2018 रोजी नागपूर येथून अटक केली होती. त्यानंतर निशांतच्या संगणकात गोपनीय माहिती आढळून आली होती. तो एका महिलेच्या हनी ट्रॅपमध्ये अडकला होता. त्यातून तो त्या महिलेला गोपनीय माहिती पुरवीत होता. ती माहिती पाकिस्तानपर्यंत पोहोचत होती. नागपूरजवळच्या मोहगाव येथे डीआरडीओचा ब्रह्मोस मिसाईल प्रकल्प आहे.

नागपूर ः पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या निशांत अग्रवालचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. निशांत ब्रह्मोस एरोस्पेसच्या नागपूर शाखेत अभियंता होता. येथील गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा त्याच्यावर आरोप आहे. त्याला उत्तर प्रदेश एटीएसने 8 ऑक्‍टोबर 2018 रोजी नागपूर येथून अटक केली होती. त्यानंतर निशांतच्या संगणकात गोपनीय माहिती आढळून आली होती. तो एका महिलेच्या हनी ट्रॅपमध्ये अडकला होता. त्यातून तो त्या महिलेला गोपनीय माहिती पुरवीत होता. ती माहिती पाकिस्तानपर्यंत पोहोचत होती. नागपूरजवळच्या मोहगाव येथे डीआरडीओचा ब्रह्मोस मिसाईल प्रकल्प आहे. हा प्रकल्प भारत व रशियाच्या संयुक्त तंत्रज्ञानावर आधारित आहे. निशांततर्फे ऍड. प्रकाश जयस्वाल तर, सरकारतर्फे ऍड. नितीन तेलगोटे यांनी कामकाज पाहिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nishant Agarwal's bail was rejected