भ्रष्टाचार दडपण्यासाठी "नासुप्र'ची बरखास्ती : प्रशांत पवार

भ्रष्टाचार दडपण्यासाठी  "नासुप्र'ची बरखास्ती :  प्रशांत पवार
नागपूर : ले-आउट मंजूर करताना नागपूर सुधार प्रन्यासच्या अधिकाऱ्यांनी प्रचंड मोठा गैरव्यवहार केला आहे. तो दडविण्यासाठीच नासुप्र बरखास्त करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याचा आरोप जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी त्यांनी मालमत्तांच्या कागदपत्रांचे ऑडिट करण्याची मागवे अशी मागणी त्यांनी केली.
कमाल जमीन धारणा कायद्यांतर्गत सुधार प्रन्यासची जागा शासनाच्या ताब्यात जाणार होती. ते लक्षात येताच जमीनधारकांनी खोट्या व चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे ले-आउट टाकले. यासाठी नासुप्रच्या अधिकाऱ्यांनीची विकासकांना मदत केल्याचा आरोपही त्यांनी केला.
572 व 1900 ले आउटमधील लेआउट गुंठेवारी कायद्यांतर्गत प्रन्यासच्या अधिकाऱ्यांनी खोट व बनावट कागदपत्राच्या आधारे मंजूर केले. शासनाकडे हस्तांतरित होणाऱ्या जागांवरही बांधकाम झाले. नासुप्र बरखास्त करून सर्व कागदपत्रे, व्यवहाराची माहिती महानगरपालिकेकडे हस्तांतरित होणार आहे. यामुळे कागदोपत्री उघड येणारा गैरव्यवहार दडपल्या जाईल. त्यामुळे मालमत्तांच्या ऑडिट केल्यावरच ती बरखास्त करावी. यात दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांनी गुन्हे दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली.
ग्रामीण भागात दोन विकास संस्था कशाला?
शहरात दोन विकास संस्था नको असल्याने सुधार प्रन्यास बरखास्त करण्यात येत आहे. ग्रामीण भागात ग्रामपंचायत कार्यरत आहे. असे असताना एनएमआरडीएची निर्मिती करण्यात आली. यामुळे ग्रामीण भागात दोन विकास संस्था झाल्या आहेत. शहरात एक आणि ग्रामीण भागात एक निकष लावण्यात येत आहे. हे योग्य नसल्याचे पवार म्हणाले.
व्हीसीएवर कारवाई कधी?
एनएमआरडीएने ग्रामीण भागातील लाखावर घरे अनधिकृत ठरवून त्यांना तोडण्याची नोटीस दिली आहे. जामठा येथील व्हीसीएम मैदानही बेकायदा आहे. त्याच्यावर कारवाई होत नाही. गरिबांवर मात्र कारवाई होत आहे. अधिकाऱ्यांनी प्रथम बेकायदा मोठ्या संस्थावर कारवाईची हिंमत दाखवावी, असे आवाहन करीत येणारा सामना होऊ देणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com