मुख्यमंत्री, गडकरी, एलकुंचवार यांच्या मुलाखती

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि ज्येष्ठ नाटककार प्रा. महेश एलकुंचवार या तिघांच्या प्रकट मुलाखती जागतिक मराठी संमेलनाचे विशेष आकर्षण ठरणार आहे. जागतिक मराठी अकादमीच्या वतीने 4, 5 व 6 जानेवारीला या संमेलनाचे वनामतीच्या सभागृहात आयोजित केले आहे.

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि ज्येष्ठ नाटककार प्रा. महेश एलकुंचवार या तिघांच्या प्रकट मुलाखती जागतिक मराठी संमेलनाचे विशेष आकर्षण ठरणार आहे. जागतिक मराठी अकादमीच्या वतीने 4, 5 व 6 जानेवारीला या संमेलनाचे वनामतीच्या सभागृहात आयोजित केले आहे.
"शोध मराठी मनाचा' संकल्पनेवर आधारित या संमेलनाचे उद्‌घाटन 4 जानेवारीला (शुक्रवार) दुपारी 1 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते होईल. संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीनिवास ठाणेदार आणि स्वागताध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रमुख उपस्थिती असेल. उद्‌घाटन सोहळ्यानंतर लगेच ज्येष्ठ कवी-चित्रपट निर्माते रामदास फुटाणे आणि प्रसिद्ध बांधकाम उद्योजक आशुतोष शेवाळकर, मुख्यमंत्र्यांची प्रकट मुलाखत घेतील, अशी माहिती स्वागताध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि संयोजक गिरीश गांधी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यानंतर राहुल घोरपडे, किशोर गोरे, अमित पाटील, आर्या टावरे, वृंदा ठाकूर, योगेश दशरथ, के. के. टावरी, महेश देशपांडे या विविध देशांमध्ये स्थायिक असलेल्या मराठी माणसांचे "सातासमुद्रापलीकडे' हे सत्र होईल. 5 जानेवारीला (शनिवार) सकाळी 10 वाजता ज्येष्ठ नाटककार प्रा. महेश एलकुंचवार यांची प्रकट मुलाखत दिग्दर्शक चंद्रकांत कुळकर्णी आणि लेखक डॉ. श्रीकांत तिडके घेणार आहेत. दुपारी "सातासमुद्रापलीकडे' या मालिकेतील आणखी एक सत्र होईल. "शून्यातून शिखराकडे' या सत्रात विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान मंडळींचा सहभाग असणार आहे. दुपारी 3.30 वाजता केंद्रीय रस्ते व भूपृष्ठ वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत होईल. "सकाळ'चे कार्यकारी संपादक शैलेश पांडे, ज्येष्ठ पत्रकार देवेंद्र गावंडे आणि राहुल पांडे ही मुलाखत घेतील. सायंकाळच्या सत्रांमध्ये पद्मश्री कल्पना सरोज, बीव्हीजी कंपनीचे संचालक हनमंत गायकवाड यांच्या प्रकट मुलाखती होतील. 6 जानेवारीला (रविवार) सकाळच्या सत्रात "काल-आज-उद्या', "तेथे कर माझे जुळती' हे कार्यक्रम होतील. दुपारी 2.30 वाजता "सरहद'चे संस्थापक संजय नहार आणि प्रभात किड्‌सचे संचालक गजानन नारे यांची प्रकट मुलाखत होईल. सायंकाळी 5 वाजता पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या उपस्थितीत संमेलनाचा समारोप होईल.
"चित्र, शिल्प, काव्य'
संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी (5 जानेवारी) सायंकाळी 7.30 वाजता सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे, सुप्रसिद्ध कवी-अभिनेते किशोर कदम, चित्रकार भाऊ दांदळे, शिल्पकार प्रमोदबाबू रामटेके तसेच कवींचा सहभाग असलेले "चित्र, शिल्प, काव्य' हे सत्र होईल. विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून निवडक कवी यामध्ये सहभागी होणार आहेत, हे विशेष.

Web Title: nitin gadakari, devendra fadanvis interview news