International Yoga Day 2019 : योगसाधनेला जागतिक मान्यता मिळणे आनंदाची बाब :नितीन गडकरी

gadkari on International Yoga Day 2019.jpg
gadkari on International Yoga Day 2019.jpg

नागपूर : आज पूर्ण जगात योगदिन उत्साहात साजरा होतो आहे. योगविज्ञान भारतीय संस्कृती, इतिहास व संपत्तीचे प्रतिक असून, योगसाधनेला जागतिक मान्यता मिळाली ही आनंदाची बाब असल्याचे मत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्‍त केले. 

महापालिका, जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ व विविध संस्थांच्या संयुक्‍त विद्यमाने यशवंत स्टेडियम येथे झालेल्या कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते. आयोजनाचे यंदाचे पाचवे वर्ष होते. यावेळी नितीन गडकरी म्हणाले, सत्तावन्न वर्षांपूर्वी जनार्दन स्वामींनी या शहरात योगसाधनेचे बिज रोवले तेच विज्ञान संपूर्ण जगाने स्वीकारले याचा विशेष आनंद वाटतो.

आता प्रत्येकाने स्वत:च्या सुदृढ आरोग्यासाठी योगविज्ञानचा संकल्प घेतला व त्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने कार्यक्रमात सहभागी झाले ही कौतुकाची बाब आहे. सकाळी 5.45 वाजता झालेल्या या कार्यक्रमात केंद्रीयमंत्री नितीन गडकरींसह 40 हजार साधकांनी योगाभ्यास केला. यावेळी शहरातील जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळासह, विविध संस्था, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, महापालिकेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com