नितीन गडकरी म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या विरोधातील सर्वांचे डिपॉझिट जप्त करा

नितीन गडकरी म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या विरोधातील सर्वांचे डिपॉझिट जप्त करा

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्याच्या झपाट्याने विकास होत आहे. पन्नास वर्षांत झाले नाही एवढी कामे त्यांनी केली असून संपूर्ण वैदभीर्यांचा मान त्यांनी वाढवला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात लढणाऱ्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त करण्याचे आवाहन नितीन गडकरी यांनी केले. 
मुख्यमंत्र्यांच्या दक्षिण-पश्‍चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातील श्‍यामनगर परिसरात झालेल्या सभेत ते बोलत होते. गडकरी यांना ऐकण्यासाठी यावेळी नागरिकांनी खचाखच गर्दी केली होती. 50 वर्षांत जितका विकास झाला नाही, त्याच्या कितीतरी पट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पाच वर्षांत कामे केली. आम्ही कामे केली म्हणून मत मागायला आलो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याचा झालेला चौफेर विकास सर्वांसमोर आहे. शहरात आज सिम्बॉयसिससह लॉ स्कूल, आयआयआयटी, एम्ससारख्या संस्था आल्या आहेत. शैक्षणिक संस्थांमुळे नागपूर-विदर्भातील तरुणांना शिक्षणासाठी यापुढे मुंबई व पुण्यात जाण्याची गरज भासणार नाही. आतापर्यंत 26 हजार तरुणांना रोजगार उपलब्ध झाला असला तरी रोजगाराची सर्वाधिक चिंता आहे. त्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत. मिहान प्रकल्पात टीसीएस, टाल, एचसीएलसारख्या कंपन्या आणल्या. एचसीएलमध्ये दोन हजार तरुणांना संधी मिळाली. तीन वर्षांत 15 हजार तरुणांना संधी मिळेल. आम्ही कधीही भेदभाव केला नाही. जात, पंथ, भाषेचा विचार न करता शहराच्या विकासावर भर दिला, असेही नितीन गडकरी म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com