मुनगंटीवार तुमचे कर्तृत्‍व डौलाने चालणाऱ्या हत्‍तीसारखे : गडकरी

Nitin Gadkari
Nitin Gadkari

चंद्रपुर : संपूर्ण भारतातील सर्वाधिक सक्षम वनमंत्री म्‍हणून सुधीर मुनगंटीवार यांनी उल्‍लेखनिय कामगिरी केली आहे. वाघिण नरभक्षक झाली म्‍हणून तिला ठार मारण्‍यात आले. यामध्‍ये वनमंत्र्यांचा कोणताही दोष नाही. ज्‍या 13 नागरिकांचे बळी नरभक्षक वाघिणीमुळे गेले त्‍यांच्‍या कुटूंबियांची दिवाळी कशी गेली असेल याचा विचार टिका करणाऱ्यांनी केला पाहिजे. तुमचे काम असेच जोमाने सुरू ठेवा. राज्‍यातील वन्‍यप्रेमी जनता तुमच्‍या पाठिशी आहे, असे कौतुकोदगार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काढले.

नॅशनल हायवे आणि सीपेट द्वारा ताडाळी येथे आयोजित कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते. यावेळी बोलताना ते पुढे म्‍हणाले, नागपूरला आम्‍ही टायगर कॅपीटल घोषित केले आहे. या परिसरात सुमारे 350 इतकी व्‍याघ्र संख्‍या आहे. ही संख्‍या वाढविण्‍यात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे मोलाचे योगदान आहे.

राज्‍यात विक्रमी वृक्ष लागवड करत महाराष्‍ट्राला हिरवेगार करण्‍याचा त्‍यांचा प्रयत्‍न जागतिक पातळीवर प्रशंसेचा विषय ठरला आहे. तुमचे कर्तृत्‍व हे डौलाने चालणा-या हत्‍तीसारखे आहे, तुमचा डौल कमी होवू देवू नका. अवघा महाराष्‍ट्र तुमच्‍या पाठिशी आहे असेही नितीन गडकरी यावेळी बोलताना म्‍हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com