नितीन गडकरींनी पंतप्रधान व्हावे - सुलेखा कुंभारे

Sulekha-Kumbhare
Sulekha-Kumbhare

नागपूर - नागपूरचे खासदार आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी देशभरात विकास केला. देशभरातील तथागताची पवित्र स्थळे बुद्धिस्ट टूरिस्ट सर्किटच्या नावाने जोडली जात आहेत. गडकरी यांच्यासारख्या मराठी व्यक्तीने पंतप्रधान बनून देशाचे नेतृत्व करावे, असे मत राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्य ॲड. सुलेखा कुंभारे यांनी आज येथे व्यक्त केले. 

मागील पाच वर्षांत लंडन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वास्तव्य केलेल्या निवासस्थान खरेदी करून स्मारकाचा दर्जा दिला. चैत्यभूमी परिसरातील इंदू मिलची जागा मिळवून देत स्मारकाच्या कामाला गती देण्यात आली. दीक्षाभूमीला जागतिक दर्जा देण्यापासून तर नागपुरातील ड्रॅगन पॅलेस चिचोलीतील शांतीवन आणि दीक्षाभूमी यांनाही जोडणारे बुद्धिस्ट सर्किट तयार करण्याचे काम युती सरकारने केले. आंबेडकरी जनतेच्या लक्षात ही कामे असून राज्यात ४६ जागा युती सरकार जिंकेल असा दावा यावेळी ॲड. कुंभारे यांनी केला. मेट्रापासून तर ग्रामीण भाग शहरांसोबत जोडला गेल्याने विकास होत आहे. पाच वर्षांत ७० हजार कोटींची कामे झाल्यामुळे नागपूरचा विकास नजरेत भरणार आहे, यामुळेच मंचातर्फे यावेळी गडकरींना पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही ॲड. कुंभारे म्हणाल्या. पत्रकार परिषदेला नगरसेविका वंदना भगत, अफजल अन्सारी, नंदा गोडघाटे उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com