पैसे थकविणाऱ्या उद्योजकांवर कारवाई नितीन गडकरी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 सप्टेंबर 2019

नागपूर : कच्च्या मालाचा पुरवठा करणाऱ्या लहान उद्योजकांचे पैसे 45 दिवसांत न देणाऱ्या मोठ्या उद्योजकांवर कठोर कारवाई करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले. विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या 56 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित व्हीआयए- सोलर विदर्भ उद्योग गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश एम. एन.

नागपूर : कच्च्या मालाचा पुरवठा करणाऱ्या लहान उद्योजकांचे पैसे 45 दिवसांत न देणाऱ्या मोठ्या उद्योजकांवर कठोर कारवाई करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले. विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या 56 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित व्हीआयए- सोलर विदर्भ उद्योग गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश एम. एन. गिलानी, व्हीआयएचे अध्यक्ष सुरेश राठी, सोलर समूहाचे अध्यक्ष सत्यनारायण नुवाल आणि टाटा स्टील इंडस्ट्रीजचे मार्केटिंग हेड संजय सहानी उपस्थित होते.दरम्यान, लाइफ टाइम अचिव्हमेन्ट अवॉर्ड अंकुर सीडसचे संचालक माधव शेंबेकर आणि आर.एम. काशिकर यांना नितीन गडकरी यांच्या हस्ते देण्यात आला. व्यवसायात चढउतार येत असतात, निराश होऊ नका, मार्ग निघेल असा आशावाद गडकरी यांनी व्यक्त केला. व्हीआयएने चांगले काम करणाऱ्यांचा सत्कार करुन नवा आदर्श निर्माण केला आहे. विदर्भाच्या विकासात व्हीआयएचा मोलाचा वाटा आहे. येत्या काळात नवीन संशोधनाला ते प्रोत्साहन देतील अशी अपेक्षा आहे. व्हीआयएने अंकुरसारख्या कंपनीला लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड देऊन खऱ्या अर्थाने कृषी क्षेत्राचाही सन्मान केला असल्याचेही गडकरी यांनी सांगितले.सत्यनारायण नुवाल म्हणाले, एरोस्पेस धोरणामुळे त्यावर आधारित उद्योग विदर्भात येतील. टाटा स्टील इंडस्ट्रीजचे मार्केटिंग हेड संजय सहानी यांचे यावेळी भाषण झाले. प्रास्ताविक व्हीआयएचे अध्यक्ष सुरेश राठी यांनी तर आभार सचिव गौरव सारडा यांनी मानले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nitin Gadkari takes action on money laundering entrepreneurs