गडकरी बोले, महामेट्रो चाले

Nitin-Gadkari
Nitin-Gadkari

नागपूर - नागपूर महापालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांना बाजूला सारून, तसेच नियमांना बगल देऊन महामेट्रोकडे शहरातील विकासाचे अनेक प्रकल्प सोपविले जात आहेत. यामागे विकासकामांमधील भ्रष्टाचारांवर पांघरून घालण्याचा हेतू असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांनी केला आहे.

नागपूर महापालिकेची अनेक कामे महामेट्रोकडे वर्ग केली आहेत. या संदर्भात बोलताना मुत्तेमवार म्हणाले, की नागपूर महापालिका ही जनतेनी निवडून दिलेली स्थानिक स्वराज्य संस्था आहे. महामेट्रो हे महामंडळ केवळ मेट्रो रेल्वे सुरू करण्यासाठी आहे. हे असताना नागपूर महापालिकेच्या अखत्यारीत असलेली कामेही महामेट्रोला देण्यामागे काय हेतू आहे? 

‘महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांना गडकरींचा आशीर्वाद आहे. महामेट्रोकडे काम गेल्यामुळे या कामासाठी कंत्राटदार निवडीचे अधिकार महामेट्रोकडे राहणार आहे. आपल्या पसंतीच्या कंत्राटदारांना निविदा देण्यासाठी महामेट्रोचा वापर केला जाणार आहे. विकासकामांमधील भ्रष्टाचार उघड होऊ नये, यासाठी गडकरी प्रत्येक काम महामेट्रोकडे वर्ग करीत आहेत,’ असा आरोप मुत्तेमवार यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com