Election Results 2019 : उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघ : कॉंग्रेसचे नितीन राऊत विजयी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

अठराव्या फेरीअखेर नितीन राऊत यांना 86 हजार 714 तर भाजपच्या डॉ. मिलिंद माने यांना 65 हजार 933 मते पडली. 

नागपूर : उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघातून कॉंग्रेसचे माजी आमदार नितीन राऊत 22 हजार मतांनी विजयी झाले आहेत. अठराव्या फेरीअखेर नितीन राऊत यांना 86 हजार 714 तर भाजपच्या डॉ. मिलिंद माने यांना 65 हजार 933 मते पडली. 
उत्तर नागपूर मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. एकेकाळी रिपाईचे येथे वर्चस्व होते. बसपाचीसुद्धा निर्णायक ताकद येथे आहे. कॉंग्रेसच्या दावणीला बांधल्या गेल्याने रिपाईची आता शकले झाली. बसपा सर्वच पक्षापासून अंतर राखून आहे. मागील निवडणुकीत कॉंग्रेसमधील अंतर्गत कलहाचा फायदा भाजपला झाला. या विजयात बसपाचा मोठा वाटा होता. बसपाचे उमेवादवार सेवानिवृत्त सनदी अधिकारी किशोर गजभिये यांनी कॉंग्रेसचे उमेदवार माजी मंत्री तसेच विद्यमान कॉंग्रसेचे कार्याध्यक्ष नितीन राऊत यांच्यापेक्षा जास्त मते घेतली होती. तिहेरी लढतीत भाजपचे डॉ. मिलिंद माने निवडूण आले होते. परंतु आता किशोर गजभिये यांनी बसपाला सोडचिठ्ठी दिली. ते कॉंग्रेसमध्ये दाखल झाले. त्यांनी उत्तर नागपूरची तिकीटही पक्षाकडे मागितली आहे. माजी आमदार आणि कार्याध्यक्ष या नात्याने नितीन राऊत यांना तिकीट मिळाली. त्यांना आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nitin Raut of Congress wins