मनपा ठेकेदाराने तोडली जलवाहिनी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 जून 2019

नागपूर : त्रिमूर्ती नगरातील सरस्वती विहार कॉलनीमधील पुलाचे बांधकाम करताना मनपा ठेकेदारांनी दोन दिवसांपूर्वी जलवाहिनी तोडल्यामुळे या परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई जाणवू लागली आहे. शहरात पाण्याची टंचाई जाणवत असताना ठेकेदाराने जलवाहिनी तोडल्याने शेकडो लिटर पाणी नाल्यात वाहून गेले. त्यामुळे संबंधित ठेकेदारावर जलवाहिनी तोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी होऊ लागली आहे.

शहरात अनेक भागांत पाण्याचे दुर्भिक्ष आहे. पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी ओसीडब्ल्यूचे प्रशासन मनपाच्या सहकार्याने शहरातील सर्वत्र सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी सज्ज आहे. विकासकामाच्या नावाखाली अनेक पायाभूत सुविधांमध्ये अडथळा निर्माण करण्याचे काम मनपा ठेकेदार करीत आहेत. यातच जलवाहिनी तोडण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मनपाच्या ठेकेदारांकडून अशा प्रकारचे कृत्य होणे हे अयोग्य आहे. जलवाहिनी तोडल्यानंतर तेथील पाइप लावून देण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदाराची आहे. कोणतीही सूचना न देता अशा प्रकारे जलवाहिनी तोडणे कायद्याने गुन्हा आहे, असे मनपाच्या अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. याबाबत ओसीडब्ल्यूचे जनसंपर्क अधिकारी सचिन द्रवेकर यांना परिसरातील नागरिकांनी कळविले. त्यांनी तातडीने चमू पाठविली आणि जलवाहिनीतून वाहून जाणारे पाणी बंद केले. परिसरातील नागरिकांनी पाण्याची टंचाई जाणवू नये म्हणून टॅंकरच्या साहाय्याने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला. तातडीने दुरुस्तीचे काम करण्यात येईल, असे आश्‍वासन दिले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NMC contractor broke the water supply