प्रसूत महिलांना बेडही मिळेना

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 जुलै 2019

यवतमाळ : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील स्त्रीरोग प्रसूती विभाग व रुग्णांची हेळसांड या समिकरणाची नाळ अधिकच घट्ट झालेली आहे. या विभागात प्रसूत महिलांना बेडही मिळत नाहीत. त्यामुळे महिलांसह बाळावर जमिनीवरच उपचार करण्यात येत असल्याचे पाहावयास मिळत आहे.
येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वॉर्ड क्रमांक सात व आठमध्ये सीझर झालेल्या महिला रुग्णांना जागेअभावी बेडच्या व्यतिरिक्त खाली बेड देऊन त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची बाब उघडकीस आली.

नवजात शिशूच्या आजूबाजूला मुंग्या, माकोडे फिरत असल्याची बाब संकल्प फाउंडशेनचे आकाश भारती यांच्या लक्षात आली. ही माहिती मिळताच प्रलय टिप्रमवार, रवी माहुरकर, मनीष इसाळकर, विनोद नराळे, गोलू डेरे आदींनी वॉर्ड गाठला. वॉर्ड क्रमांक सहा रिकामा असताना तिथे रुग्णांवर उपचार का करण्यात येत नाहीत, असा सवाल प्रशासनाला विचारला. अधिष्ठाता डॉ. मनीष श्रीगिरीवार यांची भेट घेऊन सर्व प्रकार त्यांच्या लक्षात आणून दिला. अधिष्ठातांनी संबंधित वॉर्डाचे विभाग प्रमुख चव्हाण यांना बोलावून शहानिशा करून घेतली. जमिनीवर उपचार घेत असलेल्या महिलांना दुसऱ्या वॉर्डात तत्काळ हलविण्यात यावे, प्रसूत महिला व शिशूची व्यवस्था जमिनीवर करू नये, असे निर्देश दिले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No beds for delivery women