२३ गावे बससेवेपासून वंचित

मनोज खुटाटे
मंगळवार, 24 जुलै 2018

जलालखेडा - ‘गाव तेथे एसटी’ हे ब्रीद वाक्‍य मिरवणाऱ्या एसटी महामंडळाची सेवा नरखेड तालुक्‍यातील तब्बल २३ गावांना मिळालेलीच नाही. या गावातील नागरिक कित्येक वर्षांपासून एसटीची प्रतीक्षा करीत आहेत. 

जलालखेडा - ‘गाव तेथे एसटी’ हे ब्रीद वाक्‍य मिरवणाऱ्या एसटी महामंडळाची सेवा नरखेड तालुक्‍यातील तब्बल २३ गावांना मिळालेलीच नाही. या गावातील नागरिक कित्येक वर्षांपासून एसटीची प्रतीक्षा करीत आहेत. 

बॉम्बे परिवहन महामंडळाचे १९६० मध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात रूपांतर झाले. तेव्हापासून गावांमध्ये बससेवा पोहोचावी यासाठी महामंडळ प्रयत्नरत आहे. जेथे रेल्वे सेवा नाही, अशा सर्व गावांत प्रवासासाठी एसटीशिवाय पर्याय नाही. एसटीचा प्रवास सुरक्षित समजला जातो. त्यामुळे ग्रामीण भागातील लोक मोठ्या आशेने गावाच्या फाट्यावर एसटीच्या प्रतीक्षेत असतात. त्यामुळेच राज्य परिवहन महामंडळाने ‘गाव तेथे एसटी’ असे ब्रीद घेतले आहे. गत ५० वर्षांच्या खडतर प्रवासात ‘गाव तेथे एसटी’ या ब्रीद वाक्‍याचे तीनतेरा वाजले आहेत. नरखेड तालुक्‍यातील बस सेवा नसलेल्या गावात एसटी यावी यासाठी अनेकदा निवेदने देण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांचे आर्थिक, शैक्षणिक नुकसान 
थेट गावात एसटी पोचत नसल्याने बालवृद्धांना दोन ते तीन किलोमीटरची पायपीट करत फाटा गाठावा लागतो. याचा फटका भावी पिढीला बसत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एवढे अंतर पायी चालत गेल्यावर शाळा गाठावी लागते. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. 

जीव धोक्‍यात घालून प्रवास
एसटी सेवा उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांना प्रवासासाठी खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. खासगी वाहतूकदारांमध्ये स्पर्धा होते, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवले जातात. त्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्‍यात येतो. नरखेड तालुक्‍यात २३ गावे अशी आहेत की, जेथे फाट्यापासून गावाचे अंतर जवळ आहे. रस्ते चांगले आहे, काही गावांमध्ये नदी किंवा नाले आहेत. तर काही ठिकाणी रस्ते खराब आहेत, उत्पन्न कमी असल्याची कारणेही आहेतच.

Web Title: no bus in 23 village